राज ठाकरे पुन्हा ‘मातोश्री’वर

Last Updated: Thursday, July 19, 2012 - 22:44

www.24taas.com, मुंबई

 

शिवसेनेचे कार्याध्यक्ष उद्धव ठाकरे यांच्यावर उद्या अँन्जिओप्लास्टी शस्त्रक्रिया होणार आहे. त्यांचे बंधू आणि मनसेचे अध्यक्ष राज ठाकरे यांनी आज मातोश्रीवर जाऊन त्यांची भेट घेतली.

 

अर्धा तास त्यांनी कुटुंबीयांशी चर्चा केली आणि ते घरी परतले. सोमवारी उद्धव यांना लिलावती रुग्णालयात दाखल केल्यानंतर राज अलिबाग दौरा अर्धवट सोडून मुंबईत परतले होते. उद्धव यांची भेट घेऊन संध्याकाळी त्यांना घेऊन ते मातोश्रीवरही गेले होते.

 

तब्येत सुधारेपर्यंत उद्धव सोबतच राहणार असल्याचे महाराष्ट्र नवनिर्माण सेनेचे अध्यक्ष राज ठाकरे यांनी सांगितले होते. तसेच शुक्रवारी होणाऱ्या अँजिओप्लास्टीच्या वेळी उद्धवसोबत राहणार असल्याचे राज ठाकरे यांनी स्पष्ट केले होते. अँजिओप्लास्टीवेळी सर्व ठाकरे कुटुंबीयांनी उपस्थित रहावे, अशी शिवसेनाप्रमुखांची इच्छा होती.

 

[jwplayer mediaid="142573"]First Published: Thursday, July 19, 2012 - 22:44


comments powered by Disqus