राज बनले 'सारथी' उद्धवांना सोडले 'मातोश्री'वरती

गेल्या काही वर्षांपासून राजकीय बंधनांमध्ये अडकलेल्या ठाकरे बंधूंनी सर्व बंधने झुगारून रक्ताच्या नात्यांना जवळ करत एकाच दिवशी एक नाही दोन वेळा भेट घेतली. राज ठाकरे यांनी उद्धव ठाकरे यांना आपल्या गाडीतून मातोश्रीवर सोडले.

Updated: Jul 16, 2012, 06:27 PM IST

www.24taas.com, मुंबई

 

गेल्या काही वर्षांपासून राजकीय बंधनांमध्ये अडकलेल्या ठाकरे बंधूंनी सर्व बंधने झुगारून रक्ताच्या नात्यांना जवळ करत एकाच दिवशी एक नाही दोन वेळा भेट घेतली. राज ठाकरे यांनी उद्धव ठाकरे यांना आपल्या गाडीतून मातोश्रीवर सोडले. राज ठाकरे मातोश्रीवर दाखल झाले असून ते शिवसेनाप्रमुख बाळासाहेब ठाकरे यांच्या चर्चा करणार आहेत.

 

उद्धव ठाकरे यांच्या छाती दुखू लागल्याने त्यांना लिलावती हॉस्पिटलमध्ये दाखल करण्यात आले. यावेळी अलिबाग दौऱ्यावर गेल्या राज ठाकरे यांनी उद्धव ठाकरे यांची लिलावती हॉस्पिटलमध्ये भेट घेतली. त्यानंतर उद्धव ठाकरे यांनी डिस्चार्ज मिळणार त्यावेळी राज ठाकरे पुन्हा लिलावती हॉस्पिटलमध्ये गेले, त्यावेळी त्यांनी डिस्चार्ज मिळालेल्या उद्धव ठाकरेंना आपल्या मर्सिडीज गाडीतून मातोश्रीवर सोडले. यावेळी राज  ठाकरे यांनी स्वतः गाडी चालवली. तर राज ठाकरे यांच्या शेजारी बसून उद्धव ठाकरे मातोश्रीवर दाखल झाले. आता दोन्ही ठाकरे बंधू शिवसेनाप्रमुख बाळासाहेब ठाकरे यांची भेट घेणार आहे.

 

आजाराच्या निमित्ताने का होईना, पण राज ठाकरे आणि उद्धव ठाकरे आज एकत्र आले. तब्बल साडेतीन वर्षानंतर राज ठाकरे यांनी उद्धव ठाकरे यांची भेट घेतली. राज यांनी उध्दव ठाकरे यांची भेट घेतल्यानंतर आता ते मातोश्रीवर जाऊन शिवसेनाप्रमुख बाळासाहेब ठाकरे यांची भेट घेणार आहे.

 

उध्दव यांच्या प्रकृतीबद्दल बाळासाहेब ठाकरे यांच्याशी  राज चर्चा करणार आहेत. त्यांनंतर संध्याकाळी पाच वाजता पुन्हा उध्दव यांची भेट घेणार आहेत. तसेच ते लिलावती हॉस्पिटलच्या डॉक्टरांशी चर्चा करणार आहे. आज सकाळी उध्दव ठाकरे यांना छातीत दुखू लागल्याने  लिलावतीत हॉस्पिटलमध्ये दाखल करण्यात आले.

 

काही वेळापूर्वी त्यांच्यावर अँजिओग्राफीही करण्यात आल्याची माहिती शिवसेनेचे नेते मनोहर जोशी यांनी दिली. सध्या उध्दव यांची प्रकृती चांगली आहे. दरम्यान, अलिबागमधला आपला नियोजित कार्यक्रम सोडून मनसे अध्यक्ष राज ठाकरे यांनी उद्धव यांची कुटुंबीयासह भेट घेतली.

 

शिवसेनेचे नेतेही उद्धव यांची भेट लिलावतीमध्‍ये घेतली. निलम गो-हे, दिवाकर रावते यांनी भेट घेऊन प्रकृतीची विचारपूस केली. उद्धव यांची प्रकृती चांगली असल्‍याची माहिती रावते यांनी पत्रकारांना दिली. याशिवाय  रामदास कदम, आमदार अनिल देसाई, रिपाईंचे रामदास आठवले इत्‍यादी नेत्‍यांनी उद्धव ठाकरे यांची भेट घेतली.