राष्ट्रवादीची नवी भूमिका गुंडगिरी नको

Last Updated: Thursday, December 8, 2011 - 06:47

झी २४ तास वेब टीम, मुंबई

 

गुंडगुरी करणारे लोक राजकारणात नको ही राष्ट्रवादीची भूमिका आहे. ज्या पक्षात असे लोक असतील त्यांचा जनतेनं खुशाल पराभव करावा, असं आवाहन राष्ट्रवादीचे प्रदेशाध्यक्ष मधुकरराव पिचड यांनी केलयं.

 
नारायण राणेंनी राष्ट्रवादीवर टीका केल्यानंतर राष्ट्रवादीही आक्रमक झालीये. काँग्रेसच्या मंत्र्यांना राष्ट्रवादीबरोबर आघाडी नको असेल तर त्यांनी त्यांच्या वरिष्ठांना कळवावं आणि खुशाल विरोधी बाकांवर बसावं असा टोलाही पिचड यांनी लगावलाय.

 

 

नारायण राणे आणि वनमंत्री पतंगराव कदम यांनी गेल्या काही दिवसात केलेल्या वक्तव्याचा पिचड यांनी समाचार घेतला. काँग्रेसनं स्थानिक पातळीवर अनेक ठिकाणी शिवसेना भाजपशी युती केलीये हे दुर्देवी असल्याचंही पिचड म्हणालेत.

 

 

गेल्या विधानसभा निवडणुकीत कॉंग्रेस स्वबळावर निवडणुका लढविणार, असे एकले होते; मात्र दिल्लीतून आदेश आला आणि काय झाले, ते तुम्ही पाहिले. त्यामुळे आगामी जिल्हा परिषद असो वा पंचायत समिती निवडणुका कॉंग्रेस स्वबळावर लढणार असेल तर आमचीही तयारी आहे, असा इशारा राष्ट्रवादी कॉंग्रेसचे प्रदेशाध्यक्ष मधुकरराव पिचड यांनी रत्नागिरीत दिला.

 

कॉंग्रेसच्या जिल्हाध्यक्षांनी निधी वाटपाबाबत पालकमंत्री आणि आमदारांबाबत जशी तक्रार केली, तशी तक्रार आमची सिंधुदुर्ग जिल्ह्याबाबत आहे, असे पिचड म्हणा

First Published: Thursday, December 8, 2011 - 06:47
comments powered by Disqus