रेल्वे प्रशासनाला आली जाग

Last Updated: Wednesday, November 9, 2011 - 18:35

झी २४ तास वेब टीम, मुंबई

 

एका महिलेला लोकल ट्रेनचा प्रवास करताना आपला डोळा गमवावा लागला होता. त्यामुळे रेल्वे प्रशासन खडबडून जागे झाले आहे. त्यानतंर सारी सूत्र पटकन हलवली गेली. पण नेहमीप्रमाणेच एखादी मोठी घटना घडत नाहीत तोवर प्रशासन ढिम्मच असते याचा परत एकदा अनुभव आला आहे.

 

मुंबईच्या लोकल ट्रेनमध्ये प्रवास करणाऱ्या महिलांचा सुरक्षेसाठी पोलीसांनी कडक पाउलं उचलण्याच ठरवलं आहे. रात्री 8 ते सकाळी 6 दरम्यान प्रत्येक लोकल ट्रेनच्या डब्यात तीन पोलीस कॉस्टेबल तैनात करण्यात आले आहेत. ह्याच बरोबर महिलांचा कोचवर दगड फेकण्याचा घटनांवर आळा घालण्यासाठी रेल्वे ट्रॅकच्या बाजूला असलेल्या झोपडपट्टयांचा बाजूला उंच भिंत ही तयार करण्यात येणार आहे..जेणेकरून झोपडपट्टीतून दगडफेक करणाऱ्यांवर निर्बंध येईल. नुकताच विक्रोळीत लोकल ट्रेनमधून प्रवास करणाऱ्या एका महिलेला दगड लागल्याने आपला एक डोळा गमवावा लागलेला होता..

First Published: Wednesday, November 9, 2011 - 18:35
comments powered by Disqus