रेल्वे बळींना दोन लाख, अधिकाऱ्यांवर गुन्हे

Last Updated: Thursday, April 19, 2012 - 18:19

www.24taas.com, मुंबई, नवी दिल्ली

 

 

मुंबईतील लोकलमधल्या गर्दीनं तिघांचा बळी घेतला आहे. रेल्वेचा खोळंबा हा आता प्रवाशांच्या जीवावर उठला आहे. सिग्नलचा खांबाची धडक लागल्याने एक जण बाहेर फेकला गेल्या. त्याच्याबरोबर १७जणही रेल्वेबाहेर कोसळले. हे सर्वजण जखमी झालेत.  ही घटना नाहूर स्टेशनजवळ घडली. लोकल अपघातातील मृतांच्या वारसांना १५ हजारांची तोकडी मदत देणाऱ्या रेल्वेने ही मदत वाढवून दोन लाख रूपयांपर्यंत देण्याचं जाहीर केले आहे. दरम्यान, अधिकरी आणि कर्मचाऱ्यांवर कुर्ला पोलिसात गुन्हा दाखल  करण्यात आला आहे.

 

 

 

कुर्ला येथील सिग्नल कंट्रोल रूमला आग लागली. त्यामुळे मुंबईची धमणी ठप्प झाली. त्यामुळे  कालपासून मुंबईकरांचे अतोनाथ हाल झालेत. मुंबईकरांच्या बिकट परिस्थितीकडे संपूर्ण पणे कानाडोळा करणाऱ्या रेल्वे मंत्रालयाला आता तिघांच्या मृत्यूनंतर जाग आली आहे. रेल्वेमंत्री मुकुल  रॉय यांनी मृत्यूच्या वारसांना दोन लाखांची मदत जाहीर केली आहे. या अपघाताला जे कारणीभूत आहेत, त्यांच्यावर कारवाई करण्यात येईल, असे आश्वासन रॉय यांनी दिले आहे. तसेच या अपघाताबाबत दोषी असणारे अधिकारी, कर्मचारी यांच्यावर गुन्हा दाखल करण्यात आल्याचे रॉय यांनी सांगितले.

 

 

 

दरम्यान मुख्यमंत्री पृथ्वीराज चव्हाण यांनी उद्या सायंकाळपर्यंत रेल्वे सुरळीत होईल, असे स्पष्ट केले आहेत.मध्य रेल्वेची कोलडमडलेली लोकल सेवा उद्यापर्यंत सुरळीत होणार असल्याचा दावा मध्य रेल्वे प्रशासनानं केला आहे. आज ९० टक्के लोकल रुळावर असून अर्धा तास उशिराने धावत असल्याची माहिती मुख्य जनसंपर्क अधिकाऱ्यांनी दिली आहे.

 

 

 

नाहूर आणि भांडूप स्थानकांदरम्यान लोकलमधून पडून तीन जण ठार तर १५ जण जखमी झाले आहेत. बदलापूरहून सीएसटीच्या दिशेने निघालेल्या गाडीतून १७ जण एकाचवेळी पडले होते. असे असताना रेल्वेच्या खोळंब्यामुळं आजही रेल्वे प्रवाशांचे हाल सुरुच आहेत. ठाणे रेल्वे स्टेशनमध्ये सकाळच्या गर्दीच्या वेळी तुफान गर्दी झाली होती. ठाणे स्टेशनवरुन सुटणाऱ्या अनेक लोकल रद्द करण्यात आल्या. त्यामुळं प्रवाशांचे आणखीनच हाल झाले. कर्जत कसाऱ्याहून येणाऱ्या ट्रेनमध्ये तुफान गर्दी असल्यानं ठाणे स्टेशनमध्ये प्रवाशांना लोकलमध्ये चढणं कठीण होत होतं.

 

 

 

First Published: Thursday, April 19, 2012 - 18:19
comments powered by Disqus