लताचा आवाज अजूनही तरूण- बाळासाहेब

Last Updated: Tuesday, April 24, 2012 - 21:53

www.24taas.com, मुंबई

 

लता मंगेशकर नावाचा वेल हा गगनावरी गेला आहे. सर्व जग झोपलं असतं पण लताचा आवाज जागा असतो. गेल्या ७० वर्षांपासून लता गाते आहे काही चेष्टा आहे का? किती नट्या आल्या आणि किती नट्या गेल्यात. (माधुरी सोडून) पण लताचा आवाज अजूनही तरूण आहे, असे गौरवोद्गार शिवसेनाप्रमुख बाळासाहेब ठाकरे यांनी आज गानस्रमाज्ञी लता मंगेशकर यांच्या विषयी काढले.

 

दीनानाथ मंगेशकर पुरस्कार सोहळ्यात बाळासाहेब ठाकरे बोलत होते. यावेळी आपल्या खास ठाकरी शैलीतून काही फटकेबाजी केली. यावेळी त्यांनी दीनानाथ मंगेशकर यांच्या कष्टाने काढलेल्या जीवनाची आठवण करून दिली. त्या बरोबर काही चिमटेही काढले.

 

ते म्हणाले, पूर्वी लोक नाटकाला येत होते. लोकसंख्या थोडी होती पण ती नाटकाला यायची. आता तर लोकसंख्या वाढवण्याची नाटकं सुरू आहेत.

 

 

मला लताने या कार्यक्रमासाठी बोलवलं, त्यावेळी ती म्हणाली मी भाषण करणार आहे, मग मीही म्हटलं मग मी गाण गाणार... पण मी फक्त जन गण म्हटल्यावर लोक पळून जातील.....

 

 

यावेळी अभिनेत्री माधुरी दीक्षित हीचा आदीशक्ती पुरस्कार देऊन सन्मान करण्यात आला. तसेच विक्रम गोखले आणि इतर मान्यवरांचाही पुरस्काराने गौरव करण्यात आला.

 

First Published: Tuesday, April 24, 2012 - 21:53
comments powered by Disqus