शरद पवार मुंबईत करणार 'गेम'?

Last Updated: Saturday, July 21, 2012 - 11:58

www.24taas.com, मुंबई

 

केंद्रीय कृषीमंत्री शरद पवार मुंबईत दाखल झाले आहेत. गेले काही दिवस शरद पवार मंत्रीपदाचा राजीनामा देणार या चर्चेला बरच उधाण आलं होतं, त्यामुळे राष्ट्रवादी आणि काँग्रेसमध्ये खूपच मोठ्या प्रमाणावर वाद असल्याचे दिसून आले. शरद पवार यांना ज्येष्ठतेबाबत डावलण्यात आल्याने त्यांची नाराजी झाल्याचे सांगण्यात येत आहे.

 

आज ते त्यांच्या पेडर रोडवरील सिल्वर ओक या निवासस्थानी ते राष्ट्रवादी नेत्यांची भेट घेणार आहेत. मनमोहन सिंग मंत्रिमंडळातील कृषीमंत्री शरद पवार यांच्या दुसऱ्या क्रमांकावरून काँग्रेस आणि राष्ट्रवादीतला तणाव वाढतच चालला आहे.

 

त्यामुळे आता राज्यातील सत्तेही बदल होण्याची शक्यता नाकारता येत नाही. राज्यात आघाडीची सत्ता असली तरी, नेहमीच कुरघोडी करण्याचा प्रयत्न हे दोन्ही पक्ष सोडत नाही. त्यामुळे नेहमीच आघाडीमध्ये बिघाडी होण्याची शक्यता निर्माण झालेली असते. मात्र आता शरद पवार नक्की काय खेळी खेळणार याकडेच साऱ्यांचे लक्ष लागून राहिले आहे. शरद पवार यांनी आज लीलावतीत जाऊन उद्धव ठाकरे यांची भेट घेतली

 

 

 

First Published: Saturday, July 21, 2012 - 11:58
comments powered by Disqus