शिवसेनेचे सुनील प्रभू मुंबईचे महापौर

Last Updated: Friday, March 9, 2012 - 15:28

www.24taas.com, मुंबई

 

मुंबईच्या महापौरपदी शिवसेनेचे सुनील प्रभू यांची निवड झाली आहे. त्यांनी काँग्रेसचे सुनील मोरे यांचा पराभव केला. अपक्षांच्या मदतीनं प्रभू यांनी बहुमताची मॅजिक फिगर गाठली. महापौरपदाच्या निवडणुकीत १९० नगरसेवकांनी मतदान केलं. त्यापैकी तब्बल १२५ मतं घेत सुनील प्रभू यांनी विजय मिळवला आहे.

 

आघाडीचे उमेदवार सुनील मोरे यांना ६५ मते पडली. मनसेचे २८ आणि सपाचे ९ नगरसेवक तटस्थ राहिले. प्रभू यांचे अभिनंदन करण्यासाठी शिवसेनेचे कार्याध्यक्ष उद्धव ठाकरे सहकुटुंब उपस्थित होते.

 

मुंबई महानगरपालिकेच्या महापौर आणि उपमहापौरपदासाठीची निवडणूक आज झाली. महायुती ११४ या मॅजिक फिगरच्या जवळ असल्यानं शिवसेनेचा महापौर होणार हे निश्चितच होतं. त्यामुळं आघाडीनं जरी उमेदवार उभे केले असले तरी ही निवडणूक म्हणजे केवळ औपचारीकता उरली होती.

[jwplayer mediaid="62533"]

First Published: Friday, March 9, 2012 - 15:28
comments powered by Disqus