सीबीआयला सुगावा लागणार?

Last Updated: Saturday, June 23, 2012 - 08:37

www.24taas.com, मुंबई  

 

मंत्रालयाला लागलेल्या भीषण आगीचा तपास करायला क्राईम ब्रान्चनं सुरूवात केली आहे. मुंबई क्राइम ब्रान्चनं हा तपास चार भागांत विभागलेला आहे.

 

 

1. हे अग्नीतांडव एक अपघात आहे की घातपात ?

2. या आगीच्या फोरेंसिक तपासणीच्या अहवालाचा निष्कर्ष काय असेल ?

3. घटनेच्या वेळी उपस्थित असलेल्या प्रत्यक्षदर्शीचं काय म्हणणं आहे ?

4. मंत्रालयातील सीसीटीव्हीमध्ये झालेल्या चित्रणातून या अग्नीतांडवामागचा छडा लावता येईल का?

 

गुरुवारी रात्रीपासूनच क्राइम ब्रान्चची टीम मंत्रालय परिसरात आहे. मंत्रालयाचा चौथ्या आणि पाचव्या माळ्यावर क्राइम ब्रान्चच्या टीमनं सुरुवातीला तपास केला. पण सहाव्या आणि सातव्या मजल्यावर अग्निश्मन दलाचं कुलींग ऑपरेशन सुरु असल्यामुळे शुक्रवारी टीम तिथं पोहचू शकली नाही. क्राईम ब्रांचच्या चार टीम तपास करत असून ३५ ऑफिसर्स त्याठिकाणी काम करताएत. तपासासाठी क्राईम ब्रांचनी  मंत्रालयातील सीसीटीव्ही आणि हार्ड डिस्क ताब्यात घेतलेत. तसंच फॉरेन्सिक टीमनं अनेक सॅम्पल्सही ताब्यात घेतलेत.

 

पोलिसांनी आतापर्यंत काही साक्षीदारांची साक्ष नोंदवली आहे. सीसीटीव्हीच्या मदतीनं संपूर्ण घटनेच्या आधी नेमकं काय झालं याचा शोध घेत आहेत. पोलिसांनी तपासात मदत व्हावी म्हणून मंत्रालयात जळून खाक झालेल्या ठिकाणांचं व्हिडिओ शूटिंग केलं गेलंय. फॉरेन्सिक टीमनं घटनास्थळाहून नमूने मिळवलेत. या अग्नितांडवाचा तपास लवकरात लवकर पूर्ण करून यामागच्या खऱ्या कारणांचा खुलासा पोलिसांनी करावा, अशी सामान्य जनतेची अपेक्षा आहे.

 

.

First Published: Saturday, June 23, 2012 - 08:37
comments powered by Disqus