स्कूल बस महागली, महागाईत भर

Last Updated: Friday, March 23, 2012 - 14:49

www.24taas.com, मुंबई

 

 

महागाईच्या भडक्यात आता स्कूल बसचीही भर पडलीय. जूनपासून म्हणजेच नवीन शैक्षणिक वर्षापासून, भाडेवाढीची अंमलबजावणी होणार आहे. मुंबईतल्या स्कूल बस मालकांनी महिन्याला ३००रुपयांनी भाडेवाढ केली आहे.

 

 

आता मुलांना स्कूल बसचा खर्च ७००ते ९००रुपयांवर जाण्याची शक्यता आहे. मुलांच्या शिक्षणावर खर्च करताना मेटाकुटीला आलेल्या पालकांसाठी हा नवा धक्का आहे. विद्यार्थ्यांच्या सुरक्षेची काळजी गरजेची आहे. मात्र सरकारच्या नियमांचा अतिरेक होत असल्यानं ही भाडेवाढ करण्यात आल्याचे स्कूल बस चालकांचे म्हणणे आहे. येत्या शैक्षणिक वर्षापासून स्कुलबसच्या भाड्यात दर महिन्याला ३00 रुपयांची वाढ करण्याचा निर्णय स्कूल बस ओनर्स असोसिएशनने घेतला आहे.

 

 

स्कूलबस धोरणातील सुरक्षेच्या नियमांमुळे प्रत्येक बसवर पडणारा अतिरिक्त ८५ हजार रुपयांचा बोजा पालकांवर टाकण्याचा निर्णय संघटनेने घेतला आहे. परिणामी स्कूल बसचे सध्याचे ४00 ते ६00 रु पये प्रति महिना शुल्क नव्या दरानुसार ७00 ते ९00 रुपये होईल. यामुळे आगामी शैक्षणिक वर्षाच्या प्रारंभीच पालकांचे कंबरडे मोडणार आहे. स्कूलबस धोरणातल्या सुरक्षाविषयक नियमांची काटेकोर अंमलबजावणी करण्यासाठी प्रति बस ८५ हजार रु पये खर्च येणार आहे. त्यामुळे नाईलाजास्तव ही दरवाढ करावी लागत आहे. पालकांचे पैसे वाचवण्यासाठी आम्ही या नियमांविरोधात आवाज उठवला होता, पण तो दाबून टाकण्यात आला. आता दरवाढीशिवाय पर्याय नाही, असे स्कूलबस ओनर्स असोशिएशनचे अध्यक्ष अनिल गर्ग  यांचे म्हणणे आहे.

 

व्हिडिओ पाहा...

 

[jwplayer mediaid="70804"]

First Published: Friday, March 23, 2012 - 14:49
comments powered by Disqus