१३/ ७ स्फोटः गूढ उकलले, भटकळ मास्टरमाईंड

मुंबईत १३ जुलै रोजी झालेल्या साखळी बॉम्बस्फोटाचं गूढ उकलण्यात एटीएसला यश आलं आहे. या प्रकरणी तिघांना अटक करण्यात आली. तर या प्रकरणाचा मास्टर माईंड यासीन भटकळसह आणखी तीन जण वॉन्टेंड असल्याचे एटीएस प्रमुख राकेश मारिया यांनी सांगितले.

Updated: Jan 23, 2012, 05:59 PM IST

www.24taas.com, मुंबई

मुंबईत १३ जुलै रोजी झालेल्या साखळी बॉम्बस्फोटाचं गूढ उकलण्यात एटीएसला यश आलं आहे. या प्रकरणी तिघांना अटक करण्यात आली.  तर या प्रकरणाचा मास्टर माईंड यासीन भटकळसह आणखी तीन जण वॉन्टेंड असल्याचे एटीएस प्रमुख राकेश मारिया यांनी सांगितले.

 

मुंबईत १३ जुलै रोजी झवेरी बाजार, ऑपेरा हाऊस आणि दादर येथे साखळी बॉम्बस्फोट घडवण्यात आले होते. या बॉम्बस्फोटात जवळपास वीस जण मृत्यूमुखी पडले होते तर गंभीर जखमींची संख्याही मोठी होती.

 

या प्रकरणी नकी अहमद वसी अहमद शेख, नदीम अख्तर अश्फाक शेख, हारून रशीद नाईक या तिघांना अटक करण्यात आल्याची माहिती मुंबई एटीएस प्रमुख राकेश मारिया यांनी पत्रकार परिषदेत दिली.ॉ

 

१३/७चा कसा झाला तपास....

१३ जुलै २०११ रोजी झालेल्या साखळी बॉम्बस्फोटांचा तपास 18 जुलैला एटीएसकडे तपास देण्यात आला होता. या तपासकार्यात एटीएसने एकूण १८ राज्यात तपास केला. या प्रकरणी १२३७३ साक्षीदारांचे जबाब नोंदविण्यात आले.

 

स्फोटानंतर लगेच एटीएसने घटनास्थळांचा एटीएसने ताबा घेतला आणि स्फोटांच्या स्थळाहून अनेक पुरावे शोधले. घटना स्थळांवरील ११८ सीसीटीव्ही कॅमेऱ्यांचे परिक्षण केले. या प्रकरणाच्या तपासासाठी विशेष पथक स्थापन करण्यात आले होते. हे पथक ९१ दिवस तपास करीत होते.

 

यातील एकूण एक साइटची एटीएसने तपासणी केली. त्यानंतरच आम्हांला यश मिळाल्याचे मारिया यांनी सांगितले. या प्रकरणातील आर्थिक बाजूचाही आमच्याकडून पूर्ण विचार करण्यात आला. पैसा कुठून आला, कसा पुरवला गेला, कोणाला दिला याचाही सबळ पुरावा आमच्या हाती मिळाल्याचे मारिया यांनी सांगितले. 

 
नोव्हेंबरच्या शेवटच्या आठवड्यात आमचे पथक दरभंगाला गेले. या प्रकरणी कोलकत्ता, बिहार, पंजाब, दरभंगा येथील तपास यंत्रणांनी आणि एटीएस पथकांनी आम्हांला सहकार्य केले आणि त्यामुळेच हे आरोपी पकडण्यात यश आल्याचे मारियांनी सांगितले

 

 

यातील दोघांना दरभंगा येथून अटक करण्यात आली. यातील पहिला आरोपी नकी अहमद वसी अहमद शेख, हा मूळचा देवरा-बंधोली, दरभंगा येथील रहिवासी असून तो २२ वर्षांचा आहे. तो सप्टेंबर-ऑक्टोबर २०१०मध्ये मुंबईतील मदनपुरा भागात राहण्यास  आला. तर नदीम अख्तर अश्फाक शेख, हा देखील देवरा-बंधोली, दरभंगा येथील असून तो २३ वर्षांचा आहे. तो स्फोटाच्या वेळी अँटॉप हिल परिसरात राहत होता.

 
स्फोटासाठी नकी आणि नदीम यांनी दोन स्कूटर चोरल्या. त्यातील जव्हेरी बाजारात स्फोट घडविण्यात आला ती स्कूटर खाडीलकर रोडवरून चोरली तर ऑपेरा हाऊस येथे स्फोटासाठी वापरण्यात आलेली स्कूटर किसनदास हॉस्पिटल येथून चोरली होती.

 
त्या खेरीज या दोघांनी आणखी दोन युनिकॉन मोटरसायकल डोंगरी आणि व्हीपी रोड चोरल्या होत्या. त्या मोटारसायकल ताब्यात घेण्यात आल्या आहेत. तसेच त्यांच्या बनावट चाव्या ताब्यात घेण्यात आला आहे. तसेच हेल्मेटही ताब्यात घेण्यात आले आहे.

 

 

यासीन भटकळने या साठी आर्थिक पाठबळ दिल्याचे सबळ पुरावे एटीएसकडे असल्याचे मारिया यांनी सांगितले. यासीनने नदीम अहमदला १.५ लाख रुपये दिले होते. या संदर्भातील पुरावे एटीएसकडे आहे. यासीनने  नदीम याला दिल्ली बोलावून घेतले होते. त्यावेळी त्याने नदीमला एक पाकीट दिले होते. हे पाकीट त्याने नकी अहमदला दिले. हे पाकीट स्फोट घडविण्यासाठी वापरण्यात आले.

 

 

यासीन भटकळ याने नकी अहमदची नंतर दरभंगा येथे भेट घेतली. स्फोट घडविण्यासाठी नकी अहमद याने कुंभारवाडा भागातील एका जीममध्ये सभासद झाला. त्यानंतर नकी नदीमला जीममध्ये प्रवेश मिळवून दिला. जीमची वेळ सायंकाळी ७-८ मुद्दामहून घेण्यात आली.
या प्रकरणी ३ जणांना ताब्यात घेतले असून अजूनही तीन जण वॉन्टेड असल्याचे मारिया यांनी सांगितले.

 

 स्फोटकं मुंबईत रेल्वे मार्गे आणण्यात आली होती असेही त्यांनी यावेळी सांगितले.