‘महाराष्ट्र दिन’ बिहारमध्येही साजरा करणार - नीतिश

मुंबईत आज ज्या प्रमाणे बिहार दिन साजरा करण्यात आला त्याच प्रमाणे बिहारमध्येही ‘महाराष्ट्र दिन’ साजरा करण्याची घोषणा बिहारचे मुख्यमंत्री नीति शकुमार यांनी आज येथे केली.

Updated: Apr 16, 2012, 07:51 AM IST

www.24taas.com,  मुंबई

 

मुंबईत आज ज्या प्रमाणे बिहार दिन साजरा करण्यात आला त्याच  प्रमाणे  बिहारमध्येही ‘महाराष्ट्र दिन’ साजरा करण्याची घोषणा बिहारचे मुख्यमंत्री नीतिश कुमार यांनी आज येथे केली.

 

 

मुंबईतील सोमय्या कॉलेज मैदानात आज बिहारचे मुख्यमंत्री नीतिश कुमार यांच्या उपस्थितीत  बिहार शताब्दी महोत्सव साजरा करण्यात आला. बहुचर्चित बिहार महोत्सवाला आज मुंबईत महाराष्ट्र गौरव गीताने सुरुवात झाली.  यावेळी नीतिश कुमार यांनी महाराष्ट्राचे तोंडभरून कौतुक केले.

 

 

नितीश कुमारांनी आपल्या भाषणाची सुरूवात मराठीतून केली. मराठी ही एक गोड भाषा आहे ती शिकायला नक्की आवडेल. यासंदर्भात आपण देवेश ठाकूरांकडून धडे गिरवणार असल्याचं नितीश कुमार यांनी म्हटलं आहे. तसंच महाराष्ट्रातली माणसं इथली संस्कृती आपल्याला आवडते. असं सांगत त्यांनी महाराष्ट्रावरही स्तुतीसुमनं उधळली.

 

महाराष्ट्रात बिहारी जनतेला नेहमीच सन्मानाची वागणूक मिळाली असंही निती शकुमारांनी यावेळी नमूद केलं. महाराष्ट्र आणि बिहारी जनतेचं नातं अधिक दृढ करण्यासाठी हा महोत्सव असल्याचा पुनरूच्चारही त्यांनी या प्रसंगी केला.

 

 

बिहार शताब्दी महोत्सवावरून झालेलं राजकारण, मनसेनं दिलेलं आव्हान आणि मग मागे घेतलेला विरोध, या सगळ्यानंतर या बिहार महोत्सवात मुख्यमंत्री नीतिश कुमार काय बोलणार याकडे सर्वांचे लक्ष लागलं होतं.

 

त्याचवेळी बिहारी देशात सगळीकडे आहेत. त्यांच्या मेहनतीनं ते त्या त्या ठिकाणी आपलं स्थान निर्माण करतात असं म्हणत उपस्थित बिहारी जनतेची मनं जिंकायला ते विसरले नाहीत.

 

Tags: