100 वर्षांच्या महिलेचा विनयभंग

शंभर वर्षांच्या महिलेचा विनयभंग केल्याची धक्कादायक घटना कल्याणमध्ये घडली आहे.

Updated: Apr 16, 2016, 10:55 PM IST
100 वर्षांच्या महिलेचा विनयभंग title=

मुंबई: शंभर वर्षांच्या महिलेचा विनयभंग केल्याची धक्कादायक घटना कल्याणमध्ये घडली आहे. ही महिला घरामध्ये झोपली असताना अक्षय बोराडे नावाचा 18 वर्षाचा तरुण तिच्या घरामध्ये घुसला आणि त्यानं महिलेला विवस्त्र करण्याचा प्रयत्न केला. 

बुधवारी ही घटना घडली असून शनिवारी अक्षयला अटक करण्यात आल्याची माहिती पीटीआय या वृत्तसंस्थेनं दिली आहे.