१२-१२-१२ च्या मुहूर्ताला बांधणार लग्नगाठ.... , 12-12-12 wedding date

१२-१२-१२ च्या मुहूर्ताला बांधणार लग्नगाठ....

१२-१२-१२ च्या मुहूर्ताला बांधणार लग्नगाठ....
www.24taas.com, मुंबई

आज १२-१२-१२... शतकातला शेवटचाच जादूई योग... आजचा दिवस यादगार बनविण्यासाठी अनेक जोडपी आज लग्नबंधनात अडकणार आहेत.

लग्नाच्या तयारीत असलेली चारु आपल्या लग्नासोबतच १२-१२-१२ या तारखेला लग्न होत असल्यामुळे मोठ्या उत्साहात दिसतेय. दोन महिन्यांपूर्वी लग्न ठरताना तिनं १२-१२-१२ या तारखेला लग्न करण्याची मागणी होणारा नवरा उधम मोदीकडे केली होती. १२-१२-१२ या जादूई तारखेमुळे चारुसह तिचं कुटुंबीयही खूपच खूश आहेत.
चारुसह देशभरातील अनेक जोडपी १२-१२-१२ या तारखेला लग्नबंधनात अडकणार आहेत. इतकंच नाही तर काही जोडप्यांना १२-१२-१२-१२-१२-१२ याच वेळेला म्हणजे १२ तारीख, १२ वा महिना, २०१२ साल आणि १२ वाजून १२ मिनिट आणि १२ व्या सेकंदाचा मुहूर्त गाठायचाय.

लग्नाच्या तयारीसाठी पार्लरची बुकींगही दोन महिने आधीच फुल्ल असल्याचं ब्युटी एक्सपर्टसना अनुभव येतोय. तर या जादूई अंकावर जे काम केलं जाईल ते सर्वांसाठी आनंद आणि यश घेऊन येईल असं न्युमरॉलिजिस्टचं म्हणणं आहे.

First Published: Wednesday, December 12, 2012, 08:38


comments powered by Disqus