बुधवारी लागणार बारावीचा निकाल!

बुधवारी लागणार बारावीचा निकाल!

Updated: May 24, 2016, 09:56 PM IST
बुधवारी लागणार बारावीचा निकाल! title=

मुंबई : दहावी, बारावीच्या परीक्षा दिलेल्या मुलांना तसेच त्यांच्या कुटुबियांना आता उत्सुकता असेल ती निकालाची. यंदाच्या वर्षी तब्बल १४ लाख विद्यार्थ्यांनी बारावीची परीक्षा दिली होती.

१६ मार्चला बारावीची परीक्षा संपली होती. बुधवार २५ मे रोजी दुपारी १ वाजता ऑनलाईन निकाल जाहीर होणार आहे. राज्य बोर्ड दुपारी ११ वाजता पत्रकार परिषद घेणार असून याबाबतची घोषणा करणार आहे.  

निकाल पाहण्यासाठी लिंकhttps://mahahsscboard.maharashtra.gov.in/