१९९३ साखळी बॉम्बस्फोट: वेदनेची २० वर्षे

१२ मार्च १९९३ साली मुंबईतील १२ ठिकाणी एका पाठोपाठ एक असे बारा बॉम्बफोट झाले होते. या घटनेला आज २० वर्ष पुर्ण झाले आहेत.

Updated: Mar 12, 2013, 09:27 AM IST

www.24taas.com, अजित मांढरे
१२ मार्च १९९३ साली मुंबईतील १२ ठिकाणी एका पाठोपाठ एक असे बारा बॉम्बफोट झाले होते. या घटनेला आज २० वर्ष पुर्ण झाले आहेत. या साखळी बॉम्बस्फोटांमध्ये २०० पेक्षा जास्त नागरिकांना आपला प्राण गमावला लागला होता. तर ७०० पेक्षा जास्त जण ज़ख़मी झाले होते.
देशाच्या इतिहासात १२ मार्च १९९३ ही तारीख एक काळा दिवस म्हणून लिहीली गेली. कारण याच दिवशी मुंबईत साखळी बॉम्बस्फोट झाले होते. संपूण देश या घटनेनं हादरुन गेला. मायानगरीही भांबावून गेली. मुळात इतका मोठा हल्ला आणि तोही साखळी बॉम्बस्फोटासारखा याची कल्पनाच मुंबई पोलिसांनी केली नव्हती. बॉम्बस्फोटांमागचा सुत्रधार कोण आहे. हे शोधण्यात पोलिसांनी सर्व शक्ती पणाला लावली. या साखळी बॉम्बस्फोटात २५० जणांनी आपला जीव गमावला होता तर ७०० जण जखमी झाले होते.

या प्रकरणाचा खटला जवळजवळ १४ वर्षे चालला. १२९ पेक्षा जास्त जणांना अटक करण्यात आली होती. यापैकी १०० जण दोषी ठरले. यापैकी १२ जणांना फाशी तर २३ जणांना जन्मठेप सुनावली. तर इतर ६५ आरोपींना तीन ते १२ वर्षांची शिक्षा कोर्टानं सुनावली. पण महत्वाचं म्हणजे अजूनही या प्रकरणातील १०० पेक्षा जास्त आरोपी फरार आहेत. यात दाऊद इब्राहीम आणि टायगर मेमनचा समावेश आहे.