सांताक्रुझमध्ये अज्ञात व्यक्तीच्या हल्ल्यात दोन जणांचा मृत्यू

मुंबईतल्या सांताक्रुझ परिसरात बुधवारी संध्याकाळी सातच्या सुमारास एचडीआयएलच्या बिल्डिंग साईटवर 4 ते 5 जणांनी हल्ला केलाय.

Updated: Jul 28, 2016, 10:19 AM IST
सांताक्रुझमध्ये अज्ञात व्यक्तीच्या हल्ल्यात दोन जणांचा मृत्यू title=

मुंबई : मुंबईतल्या सांताक्रुझ परिसरात बुधवारी संध्याकाळी सातच्या सुमारास एचडीआयएलच्या बिल्डिंग साईटवर 4 ते 5 जणांनी हल्ला केलाय.

या हल्ल्यात नदीम खत्री आणि बाबू कुर्ला अशा 2 जणांचा मृत्यू झाला असून दोन जण गंभीर जखमी आहेत. जखमींना रुग्णालयात दाखल करण्यात आलंय. 

तसंच मृत्यू झालेले दोघेजण हे साईट सुपरव्हाजर असल्याची माहिती मिळतेय. हा हल्ला धारदार शस्त्राने केला असून पूर्ववैमनस्यातून करण्यात आलाय की त्यामागे आणखी काही कारण आहे याबाबत पोलिस कसून तपास करतायत.