मनसेची बहुचर्चित 'ब्लू प्रिंट' अखेर जाहीर होणार

महाराष्ट्र नवनिर्माण सेनेचे अध्यक्ष राज ठाकरे यांनी बहुचर्चित ब्लू प्रिंटसाठी पुन्हा एकदा नवीन मुहूर्त जाहीर केला आहे. 

Updated: Sep 20, 2014, 10:09 PM IST
मनसेची बहुचर्चित 'ब्लू प्रिंट' अखेर जाहीर होणार title=

मुंबई : महाराष्ट्र नवनिर्माण सेनेचे अध्यक्ष राज ठाकरे यांनी बहुचर्चित ब्लू प्रिंटसाठी पुन्हा एकदा नवीन मुहूर्त जाहीर केला आहे. 

महाराष्ट्राच्या विकासाची ब्लू प्रिंट जाहीर करण्यासाठी अखेर मनसेला मुहूर्त सापडला आहे. येत्या 10 सप्टेंबर रोजी मुंबईत मनसेची ब्लू प्रिंट जाहीर होणार आहे.

मुंबईतील षण्मुखानंद सभागृहात 9 आणि 10 तारखेला मनसेचा कार्यक्रम होणार आहे. या कार्यक्रमात राज ठाकरेंची ब्लू-प्रिंट महाराष्ट्रासमोर येणार आहे.

मनसे अध्यक्ष राज ठाकरेंनी काही वर्षांपूर्वी ब्लू प्रिंटची घोषणा केली. मात्र ती अजूनही प्रत्यक्षात उतरली नाही. राज ठाकरे यांच्या विकासाच्या ब्लू प्रिंन्टमध्ये अखेर काय आहे, याकडे मनसे कार्यकर्त्यांसह विरोधकांचं लक्ष लागून आहे.

* इतर ताज्या बातम्या सदैव पाहण्यासाठी झी २४ तासला फेसबुकवर जॉइंन करा.

* झी २४ तासला ट्विटरवर फोलो करा.