माजी पेट्रोलियम मंत्री मुरली देवरा यांचं निधन

माजी पेट्रोलियम मंत्री मुरली देवरा यांचं पहाटे निधन झालं, पहाटे साडेतीनच्या सुमारास त्यांनी अखेरचा श्वास घेतला.  मुरली देवरा अनेक दिवसांपासूनआजारी होते. अखेर आज वृद्धापकाळाने त्यांचं निधन झालं

Updated: Nov 24, 2014, 08:12 AM IST
माजी पेट्रोलियम मंत्री मुरली देवरा यांचं निधन title=

मुंबई : माजी पेट्रोलियम मंत्री मुरली देवरा यांचं पहाटे निधन झालं, पहाटे साडेतीनच्या सुमारास त्यांनी अखेरचा श्वास घेतला.  मुरली देवरा अनेक दिवसांपासूनआजारी होते. अखेर आज वृद्धापकाळाने त्यांचं निधन झालं

यूपीए सरकारच्या काळात मुरली देवरा यांच्याकडे पेट्रोलियम आणि नैसर्गिक वायू मंत्रालयाची जबाबदारी होती.
 
मुंबईतील गिरगाव चंदनवाडीत अंत्यसंस्कार दुपारी ४ वाजता त्यांच्या पार्थिवावर अंत्यसंस्कार करण्यात येतील. त्यापूर्वी मुरली देवरा यांचं पार्थिव आज दुपारी 12 वाजता मुंबईतील काँग्रेस कार्यालयात अंत्यदर्शनासाठी ठेवण्यात येणार आहे. 
 
काँग्रेसचे निष्ठावंत नेते म्हणून मुरली देवरा यांची ओळख होती. गांधी घराण्याशीही त्यांचे अत्यंत जिव्हाळ्याचे संबंध होते. त्यांचे पुत्र मिलिंद देवरा हे दक्षिण मध्य मुंबईचे माजी खासदार होते.
 
मुरली देवरांचा राजकीय प्रवास
१) मुरली देवरा 1968 पासून 1978 पर्यंत मुंबई नगर निगमचे काऊंसलर

२) 1977 ते 1978 पर्यंत देवरा यांनी मुंबईच्या महपौरपदी निवड
 
३) देवरा यांनी 1980 मध्ये पहिल्यांदाच लोकसभा लढवली. 

४) दक्षिण मुंबई मतदारसंघातून निवडणुकीच्या रिंगणात उभ्या राहिलेल्या देवरा यांचा जनता पक्षाच्या रतनसिंह राजदा यांनी पराभव केला. मात्र त्यानंतर ते चार वेळा दक्षिण मुंबईचे खासदार 
 
५) उद्योजक असलेले देवरा 2006 मध्ये मणीशंकर अय्यर यांच्या जागी केंद्रीय पेट्रोलियम आणि वायू मंत्री बनले. त्याआधी त्यांच्याकडे कोणतंही मंत्रिपद नव्हतं.

 

* इतर ताज्या बातम्या सदैव पाहण्यासाठी झी २४ तासला फेसबुकवर जॉइंन करा.

* झी २४ तासला ट्विटरवर फोलो करा.