नर्सरीसाठी प्रवेशासाठी किमान वय ३ वर्ष निर्धारित

नर्सरीमध्ये प्रवेशासाठी बालकांच्या वयाची मर्यादा निश्चित करण्यात आलीय. 

Updated: Jan 4, 2016, 11:28 AM IST
नर्सरीसाठी प्रवेशासाठी किमान वय ३ वर्ष निर्धारित title=

मुंबई : नर्सरीमध्ये प्रवेशासाठी बालकांच्या वयाची मर्यादा निश्चित करण्यात आलीय. 

नर्सरीसाठी किमान ३ वर्ष वयोमर्यादा निश्चित करण्यात आलीये, तर पहिलीच्या प्रवेशासाठी ६ वर्षे पुर्ण असणं आवश्यक असणारेय.  

प्राथमिक शिक्षण विभागाच्या वतीनं हा महत्त्वपूर्ण निर्णय घेण्यात आला असून २०१६-१७ या शैक्षणिक वर्षांपासुन या निर्णयाची अंमलबजावणी करण्याबाबत आदेश देण्यात आले आहेत.