जगातील लठ्ठ महिलेचे ५ दिवसांत ३० किलो वजन घटवले

जगातील सर्वात लठ्ठ महिला इमान अहमदचे गेल्या ५ दिवसांत डॉक्टरांनी तब्बल ३० किलो वजन घटवलेय. 

Updated: Feb 17, 2017, 03:41 PM IST
जगातील लठ्ठ महिलेचे ५ दिवसांत ३० किलो वजन घटवले

मुंबई : जगातील सर्वात लठ्ठ महिला इमान अहमदचे गेल्या ५ दिवसांत डॉक्टरांनी तब्बल ३० किलो वजन घटवलेय. 

इजिप्तच्या इमानला उपचारासाठी मुंबईत आणण्यात आलेय. येथे तिच्यावर उपचार सुरु असून सर्जरीद्वारे तिचे ३० किलो वजन घटवण्यात आलेय. लठ्ठपणामुळे इमानला मधुमेह, हृदयविकार, थायरॉइड यासारखे आजार जडलेत. 

त्यामुळे तिच्यावरील उपचारादरम्यान डॉक्टरांनाही अनेक आव्हानांना सामोरे जावे लागतेय. वर्षभरात २०० किलो वजन करण्याचा डॉक्टरांचा प्रयत्न असणार आहे. पुढील ४ ते ५ महिन्यात तिचे ८० ते १०० किलो वजन कमी केले जाणार आहे. 

शनिवारी इमान मुंबईत उपचारांसाठी दाखल झाली. अकराव्या वर्षापासून लठ्ठपणामुळे अंथरुणाला खिळलेल्या इमानला सर्वच कामांसाठी तिच्या आई आणि बहिणीवर अवलंबून रहावे लागते. गेल्या अनेक वर्षांत ती घराबाहेर पडू शकलेली नाहीये. सर्वच कामे तिला जागेवरुनच करावी लागतात. 

By continuing to use the site, you agree to the use of cookies. You can find out more by clicking this link

Close