शाई हल्ला : शिवसेनेच्या सहा कार्यकर्त्यांना अटक, जामीन

मुंबई भाजपचे माजी सदस्य आणि ऑब्झर्व्हर रिसर्च फाऊंडेशन अध्यक्षचे सुधींद्र कुलकर्णी यांच्यावर करण्यात आलेल्या शाई हल्ला प्रकरणी शिवसेनेच्या सहा कार्यकर्त्यांना पोलिसांनी अटक केली. त्यांची जामिनावर सुटका करण्यात आली.

Updated: Oct 13, 2015, 01:35 PM IST
शाई हल्ला : शिवसेनेच्या सहा कार्यकर्त्यांना अटक, जामीन   title=

मुंबई : मुंबई भाजपचे माजी सदस्य आणि ऑब्झर्व्हर रिसर्च फाऊंडेशन अध्यक्षचे सुधींद्र कुलकर्णी यांच्यावर करण्यात आलेल्या शाई हल्ला प्रकरणी शिवसेनेच्या सहा कार्यकर्त्यांना पोलिसांनी अटक केली. त्यांची जामिनावर सुटका करण्यात आली.

अधिक वाचा : शिवसेनेचं आंदोलन कायम, अफवांवर विश्वास ठेऊन नका - राऊत

मुंबईत पाकिस्तानचे माजी परराष्ट्र मंत्री खुर्शीद महमूद कसुरी यांच्या पुस्तक प्रकाशन कार्यक्रमाला शिवसेनेने विरोध केला होता. मात्र, आयोजकांनी विनंती करुनही त्यांनी कार्यक्रमक केला. आमचा पाकिस्तानला विरोध कायम आहे. त्यामुळे आम्ही हा कार्यक्रम उधळून लावू असा इशारा शिवसेनेने दिला होता. कडक पोलीस बंदोबस्तात पुस्तक प्रकाशनाचा कार्यक्रम घेतला. यावेळी शिवसेनेकडून सुधींद्र कुलकर्णी यांच्या चेहऱ्यावर शाई फेकण्यात आली.

अधिक वाचा : पुस्तक प्रकाशन सोहळ्यात कसुरींचा मोदीना टोला

शाई हल्याप्रकरणी गुन्हा दाखल करण्यात आला होता. याप्रकणी शिवसेनेच्या सहा कार्यकर्त्यांना पोलिसांनी अटक केली. यात शाखाप्रमुख गजानन पाटील, दिनेश प्रसाद, अशोक वाघमारे, प्रकास हसबे, समाधान जाधव, व्यंकटेश नायर यांचा समावेश होता. त्यांची नंतर जामिनावर सुटका करण्यात आली.

* इतर ताज्या बातम्या सदैव पाहण्यासाठी झी २४ तासला फेसबुकवर जॉइंन करा.

*   झी २४ तासला ट्विटरवर फोलो करा.