मुंबईत आणखी ६ हजार सीसीटीव्ही लावणार

देशाची आर्थिक राजधानी असलेली मायानगरी मुंबई, आता संपूर्णपणे सीसीटीव्हीच्या नजरेखाली येणार आहे. 

Updated: Sep 28, 2016, 10:08 PM IST
 मुंबईत आणखी ६ हजार सीसीटीव्ही लावणार title=

मुंबई : देशाची आर्थिक राजधानी असलेली मायानगरी मुंबई, आता संपूर्णपणे सीसीटीव्हीच्या नजरेखाली येणार आहे. 

संपूर्ण मुंबई शहर आणि उपनगर सीसीटीव्हीच्या कक्षेत येणार आहे. याकरता तब्बल सहा हजार सीसीटीव्हीचं जाळंच मुंबईभर उभारण्यात आलंय. 

2 ऑक्टोबरला या सीसीटीव्ही यंत्रणेचं उद्घाटन मुख्यमंत्र्यांच्या हस्ते मुंबईतल्या ष्णमुखानंद सभागृहात केलं जाणार आहे. 

26 नोव्हेंबर 2008 ला मुंबईवर दहशतवादी हल्ला झाला. त्यानंतर मुंबईच्या सुरक्षेसाठी उपाय सुचवण्याकरता नेमलेल्या राम प्रधान समितीनं, काही सूचना केल्या होत्या. 

शहराला सीसीटीव्हीचं सुरक्षा कवच असावं, ही त्यापैकी एक महत्त्वाची सूचना होती. हल्ल्यानंतर सुमारे आठ वर्षांनी का होईना, पण अखेर ही यंत्रणा कार्यान्वित होत आहे.