88 हजार जणांनी निवडला नोटाचा पर्याय

राज्यात नुकत्याच झालेल्या 10 महापालिका निवडणुकीत मोठ्या प्रमाणात मतदारांनी नोटाचा पर्याय निवडला. मुंबई महापालिका निवडणुकीतही नोटाचा पर्याय निवडणाऱ्या मतदार राजाचे प्रमाण अधिक होते.

Updated: Feb 26, 2017, 12:35 PM IST
88 हजार जणांनी निवडला नोटाचा पर्याय title=

मुंबई : राज्यात नुकत्याच झालेल्या 10 महापालिका निवडणुकीत मोठ्या प्रमाणात मतदारांनी नोटाचा पर्याय निवडला. मुंबई महापालिका निवडणुकीतही नोटाचा पर्याय निवडणाऱ्या मतदार राजाचे प्रमाण अधिक होते.

2014मध्ये नोटाचा पर्याय ईव्हीएम मशीनवर उपलब्ध करुन देण्यात आल्यानंतर महापालिका निवडणुकीत नोटाचा वापर पहिल्यांदा झाला. या निवडणुकीत मुंबईच्या तब्बल 87 हजार 719 मतदारांनी या पर्यायाच वापर केला. 

आपल्या प्रभागातील एकाही उमेदवाराला आपली पसंती नसेल तर त्या मतदाराला नोटाचा म्हणजेच नन ऑफ दी अबाव्ह या पर्यायाचा वापर करता येतो. 

मुंबईतील वांद्रे पूर्व येथील 91 क्रमांकाच्या वॉर्डमध्ये सर्वाधिक 1 हजार 135 मतदारांनी नोटा हे बटण दाबले. तर मानखुर्दमधील वॉर्ड नंबर 47मध्ये नोटाचा वापर करणाऱ्या मतदारांची संख्या कमी होते.