आमदार नितेश राणे यांच्याविरोधात खंडणीचा गुन्हा दाखल

Last Updated: Saturday, May 20, 2017 - 07:50
आमदार नितेश राणे यांच्याविरोधात खंडणीचा गुन्हा दाखल

मुंबई : काँग्रेस आमदार नितेश राणे आणि अन्य दोघांविरोधात सांताक्रुझ पोलीस ठाण्यात खंडणी, धमकी आणि घुसखोरीचा गुन्हा दाखल करण्यात आला आहे. याप्रकरणी मोईन शेख आणि मोहम्मद अंसारी या दोघांना पोलिसांनी अटक केली आहे.

जुहू तारा रोड इथल्या हॉटेल ऍस्थेलाचे मालक हितेश केसवानी यांनी याबाबत पोलिसांत तक्रार दाखल केली. २०१६ पासून नितेश राणे हे त्यांच्या पराग संघवी नावाच्या एका मित्राला हॉटेल व्यवसायात भागीदार करुन घे अशा धमकी देत होते असा आरोप केसवानी यांनी केलाय. 

काही काळाने बळजबरीने तो व्यवहार झाल्यानंतर व्यवसाय तोट्यात गेला आणि पराग संघवी गुंतवलेली रक्कम परत मागू लागले. तसंच प्रति महिना दहा लाख रुपये द्यावेत अशी धमकी दिल्याचा आरोपही केसवानी यांनी त्यांच्या तक्रारीत केलाय. पैसे देत नसल्याने शुक्रवारी मोईन शेख आणि मोहम्मद अंसारी यांनी हॉटेल अॅस्थेलोची तोडफोड केली. 

यावेळी हॉटेल मॅनेजरनं पोलिसांना फोन केल्यानं पोलीस घटनास्थळी पोहचले आणि दोघांनाही अटक केली. या घटनेबाबत आणि तक्रारीसंदर्भात नितेश राणे यांच्याशी संपर्क साधला असता त्यांनी हा प्रकार गैरसमजूतीमधून घडल्याचा दावा केलाय. केसवानी लवकरच तक्रार मागे घेतील असंही ते म्हणालेत. 

First Published: Saturday, May 20, 2017 - 07:50
comments powered by Disqus