आमीर मराठीतून समजावणार पाणीबचतीचं महत्व

दुष्काळग्रस्तांसाठी  सरकारी मदत तोकडी पडत आहे. यामुळेच लोकसहभागातून पाणीबचतीचं महत्त्व जनतेला समजून सांगण्याचं काम, आता अभिनेता आमीर खान करणार आहे. तेही मराठी भाषेतून... 

Updated: May 31, 2015, 11:22 PM IST
आमीर मराठीतून समजावणार पाणीबचतीचं महत्व title=

मुंबई : दुष्काळग्रस्तांसाठी  सरकारी मदत तोकडी पडत आहे. यामुळेच लोकसहभागातून पाणीबचतीचं महत्त्व जनतेला समजून सांगण्याचं काम, आता अभिनेता आमीर खान करणार आहे. तेही मराठी भाषेतून... 

दुष्काळ आणि पाणीसंकट यांचं वास्तववादी चित्रण आमीर खानच्या लगान चित्रपटातल्या गाण्यात आहे. आता आमीर चित्रपटापलिकडे जात सामाजिक जाणिवेतून महाराष्ट्रातला दुष्काळकमी करण्यासाठी पुढे सरसावला आहे. 

राज्याच्या  जलयुक्त शिवार योजनेत लोकसहभाग वाढवून पाणी संवर्धनाचं आवाहन आमीर करणार आहे. 

झी मीडियाला सूत्रांनी दिलेल्या माहितीनुसार आमीर खान दुष्काळावर मात करण्यासाठी, विविध कालावधीच्या व्हिडिओ क्लीप्सद्वारे जनजागृती करणार आहे. हे सर्व कार्यक्रम मराठीभाषेतून असणार आहेत. टीव्हीसह, सोशल मीडियाचाही वापर यासाठी केला जाणाराय. 

याआधी आमीर खाननं सत्यमेव जयते कार्यक्रमाच्या माध्यमातून विविध सामाजिक विषयांना हात घातला होता. आता महाराष्ट्राला भेडसावणाऱ्या भीषण दुष्काळाचा सामना करण्यासाठी, तसंच शेतकऱ्यांना दिलासा देण्यासाठी, मिस्टर पर्फेक्शनिस्ट सरसावला आहे. 

* इतर ताज्या बातम्या सदैव पाहण्यासाठी झी २४ तासला फेसबुकवर जॉइंन करा.

* झी २४ तासला ट्विटरवर फोलो करा.