आमदार प्रशांत परिचारकांवर अखेर निलंबनाची कारवाई

विधानपरिषदेचे भाजप आमदार प्रशांत परिचारक यांच्यावर अखेर निलंबनाची कारवाई करण्यात आलीय. विधान परिषदेत त्यांच्या दीड वर्षांच्या निलंबनाचा प्रस्ताव आणण्यात आला आणि तो एकमतानं मजूर करण्यात आला. 

Updated: Mar 9, 2017, 01:22 PM IST
आमदार प्रशांत परिचारकांवर अखेर निलंबनाची कारवाई title=

मुंबई : विधानपरिषदेचे भाजप आमदार प्रशांत परिचारक यांच्यावर अखेर निलंबनाची कारवाई करण्यात आलीय. विधान परिषदेत त्यांच्या दीड वर्षांच्या निलंबनाचा प्रस्ताव आणण्यात आला आणि तो एकमतानं मजूर करण्यात आला. 

मात्र परिचारकांची 9 सदस्यीय समितीमार्फत चौकशी करण्यात येणार असल्याची घोषणा महसूलमंत्री चंद्रकांत पाटील यांनी केलीय. त्यामुळं परिचारकांना चौकशीला सामोरं जावं लागणार आहे. 

आमदार प्रशांत परिचारकांनी सैनिकांच्या पत्नींबाबत वादग्रस्त विधान केलं होतं. त्यावरून अधिवेशनाच्या सुरूवातीपासूनच विरोधकांनी प्रशांत परिचारकांच्या वक्तव्याच्या मुद्यावरून सरकारला घेरलं होतं. 

तसंच सभागृहाचं कामकाजही वारंवार बंद पाडण्यात आलं होतं. त्यामुळं सरकारनं या प्रकरणाची गंभीर दखल घेत परिचारकांवर निलंबनाची कारवाई केली.