कार्यकर्त्यांना हवेत उध्दव ठाकरे मुख्यमंत्रीपदी

विधानसभा निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर शिवसेना पक्षप्रमुख उद्धव ठाकरे यांच्या वाढदिवसाला राजकीयदृष्टया महत्त्व प्राप्त झालंय. 'मुख्यमंत्री - उद्धव ठाकरे'या मोहिमेला बळ देण्याची नामी संधी या निमित्तानं शिवसैनिकांना मिळालीय.. 

Updated: Jul 26, 2014, 11:46 PM IST
कार्यकर्त्यांना हवेत उध्दव ठाकरे मुख्यमंत्रीपदी title=

मुंबई : विधानसभा निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर शिवसेना पक्षप्रमुख उद्धव ठाकरे यांच्या वाढदिवसाला राजकीयदृष्टया महत्त्व प्राप्त झालंय. 'मुख्यमंत्री - उद्धव ठाकरे'या मोहिमेला बळ देण्याची नामी संधी या निमित्तानं शिवसैनिकांना मिळालीय. 

उद्धव ठाकरे यांची मुख्यमंत्रीपदाची महत्त्वकांक्षा लपून राहिलेली नाहीये. आता विधानसभा निवडणूक जसजशी जवळ येतेय तशी ही महत्त्वाकांक्षा अधोरेखित होऊ लागलीय...रविवारी उद्धव ठाकरे यांचा वाढदिवस आहे... गोपीनाथ मुंडे यांच्या अपघाती निधनामुळे वाढदिवस साधेपणानं साजरा करण्याच्या सूचना शिवसैनिकांना देण्यात आल्याहेत...मात्र विधानसभा निवडणुकीच्या वातावरणात शक्तिप्रदर्शनाची ही नामी संधी सोडण्याची शिवसैनिकांची इच्छा नाहीये...मुंबईसह राज्यभरात उद्धव यांच्या वाढदिवसानिमित्त शिवसैनिकांमध्ये उत्साह आहे...उद्धव यांना वाढदिवसाच्या शुभेच्छा देणारे पोस्टर्स, होर्डिंग्ज, जाहिराती झळकताहेत...' अब की बार मोदी सरकार ' घोषणेनंतर आता ' अब की बार उद्धव ठाकरे सरकार ' चा नारा शिवसैनिक देत आहेत. 
 
पक्षाच्या नेत्यांप्रमाणेच शिवसैनिकांचीही उद्धव ठाकरे यांनीच राज्याचे मुख्यमंत्री व्हावं अशी इच्छा आहे. त्यासाठी पक्षप्रमुखांच्या संकल्पनेतून आखण्यात आलेल्या 'माझा महाराष्ट्र, भगवा महाराष्ट्र ' आणि ' मिशन 150 ' या मोहिमेसाठी शिवसैनिकांनी स्वतःला झोकून दिलंय...मुख्यमंत्री उद्धव ठाकरे या आणि याच धैयानं शिवसैनिक मेहनत घेताहेत...त्यामुळे सहाजिकच निवडणुकीच्या वातावरणात साजरा होत असलेला उद्धव ठाकरेंचा वाढदिवस शिवसैनिकांच्या दृष्टीनं अत्यंत महत्त्वाचा आहे. 

लोकसभा निवडणूकीत शिवसेनेचे 18 खासदार निवडून आलेत...निवडणूकीत नरेंद्र मोदींच्या लोकप्रियतेचा फायदा शिवसेनेला झाला हे सर्वाना चांगलच ठाऊक आहे. अशावेळी विधानसभा निवडणूकीच्या जागावाटप आणि मुख्यमंत्री पदावरुन भाजपचं शिवसेनेवर दबावाचं राजकारणाही सुरु झालंय...युतीमध्ये या मुद्यांवर असलेल्या स्पर्धेत शिवसैनिकांमधला उत्साह निवडणुकीपर्यंत टीकावा याची खबरदारी पक्षाचे नेते घेताहेत...अशावेळी उद्धव यांचा वाढदिवस ही पक्षात नामी संधी म्हणून पाहिली जातेय.

* इतर ताज्या बातम्या सदैव पाहण्यासाठी झी २४ तासला फेसबुकवर जॉइंन करा.

* झी २४ तासला ट्विटरवर फोलो करा.