आदर्श घोटाळ्याप्रकरणी सीबीआयला जोरदार धक्का

आदर्श बेनामी फ्लॅट्सप्रकरणी सीबीआयने पुन्हा एकदा अधिक सखोल तपास करावा असा आदेश मुंबई हायकोर्टानं दिला आहे.

Updated: Oct 5, 2016, 10:54 PM IST
आदर्श घोटाळ्याप्रकरणी सीबीआयला जोरदार धक्का title=

मुंबई : आदर्श बेनामी फ्लॅट्सप्रकरणी सीबीआयने पुन्हा एकदा अधिक सखोल तपास करावा असा आदेश मुंबई हायकोर्टानं दिला आहे.

सीबीआयला हा मोठा धक्का मानला जात आहे. आम्हाला तपासासाठी सहा महिने लागतील असं सीबीआयनं कोर्टाला सांगितलं पण कोर्टानं तुम्ही तपास करा आणि दोन महिन्यात सीबीआयनं किती तपास केला आहे याचा अहवाल सादर करावा, असा आदेशही कोर्टाने दिला आहे. 

यापूर्वी सीबीआयने या प्रकरणी दोन सीलबंद अहवाल कोर्टाला सादर केले होते. त्यावर कोर्टानं तीव्र नाराजी व्यक्त केली होती.

सुनावणी दरम्यान सीबीआयला पुढील चौकशी करायची आहे की नाही हे कोर्टात हजर असलेल्या सीबीआयच्या पश्चिम विभागाच्या सहसंचालकांनी 'हो' किंवा 'नाही' अशा स्वरूपात स्पष्टपणे सांगावं अशा शब्दांत मुंबई हायकोर्टानं फटकारलं.

सीबीआयने या प्रकरणी आपला तपास संपला असल्याचं कोर्टाला दिलेल्या दोन सीलबंद अहवालात म्हटलं होतं.  तर चौकशी संपली आहे, पण कोर्टाने आदेश दिल्यास सीबीआय पुन्हा चौकशी करेल असं सीबीआयच्या वकिलांनी कोर्टाला सांगितलं.