चड्डी बनियननंतर चिल्लर गॅंगचा धुमाकूळ

गेल्या महिन्यात वसई-विरारमध्ये चड्डी बनियन गॅंगनं मोठ्या प्रमाणात धुमाकूळ घातला होता. त्यात आता चिल्लर गॅंकची भर पडलेय.

Updated: Nov 5, 2015, 12:03 AM IST
चड्डी बनियननंतर चिल्लर गॅंगचा धुमाकूळ  title=

मुंबई : गेल्या महिन्यात वसई-विरारमध्ये चड्डी बनियन गॅंगनं मोठ्या प्रमाणात धुमाकूळ घातला होता. त्यात आता चिल्लर गॅंकची भर पडलेय.

चड्डी बनियन या गॅंगची दहशत कमी होते न होते तोच आता चिल्लर गॅंगचा धुमाकूळ सुरु झालाय. नागरिक भीतीच्या छायेखाली आहेत. नालासोपारा पूर्वेकडील अचोळे परिसरात एकाच रात्रीच तीन दुकाने फ़ोडून चिल्लर गॅंग फ़रार झाल्याची घटना घडलीय.

या चिल्लर गॅंगचे पाच जण सीसीटीव्ही कॅमेऱ्यात कैद झाले असून हे पाचही जण २० वर्षाखालील मुलं असल्याचं स्पष्ट दिसत आहे. याबाबत तुळींज पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

* इतर ताज्या बातम्या सदैव पाहण्यासाठी झी २४ तासला फेसबुकवर जॉइंन करा.

*   झी २४ तासला ट्विटरवर फोलो करा.