अजित पवारांसह, काहींना आता निवडणूक लढवता येणार नाही

भ्रष्टाचाराचा ठपका ठेवून ज्या बँकांचे संचालक मंडळ बरखास्त आलंय, अशा संचालक मंडळातल्या सदस्यांना पुढची दहा वर्ष निवडणूक लढवता येणार नाही. आज झालेल्या मंत्रिमंडळ बैठकीत या निर्णयावर शिक्कमोर्तब करण्यात आलं.  

Updated: Jan 5, 2016, 07:36 PM IST
अजित पवारांसह, काहींना आता निवडणूक लढवता येणार नाही title=

पुणे : भ्रष्टाचाराचा ठपका ठेवून ज्या बँकांचे संचालक मंडळ बरखास्त आलंय, अशा संचालक मंडळातल्या सदस्यांना पुढची दहा वर्ष निवडणूक लढवता येणार नाही. आज झालेल्या मंत्रिमंडळ बैठकीत या निर्णयावर शिक्कमोर्तब करण्यात आलं.  

माजी उपमुख्यमंत्री अजित पवार, राष्ट्रवादीचे ज्येष्ठ नेते हसन मुश्रीफ, जयंत पाटील मधुकर चव्हाण, दिलीप सोपल,  काँग्रेस नेते विजय वडेट्टीवार माणिकराव कोकाटे, विजयसिंह मोहिते पाटील,  शिवसेना खासदार आनंदराव अडसूळ, भाजप नेते पांडूरंग फुंडकर, शेकापच्या मिनाक्षी पाटील यांना या निर्णयाचा फटका बसणार आहे. 

सहकार क्षेत्रातील राष्ट्रवादीची मक्तेदारी मोडून काढण्याचा भाजपचा प्रयत्न असल्याचं बोललं जातंय. तर विरोध पक्षनेते राधाकृष्ण विखे पाटील यांनी सरकारच्या या निर्णयाला विरोध दर्शवलाय.