MPSC परीक्षा पुढे ढकलली जाऊ शकते - अजित पवार

उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी देखील MPSC परीक्षा ५ ते १० दिवस पुढे ढकलली जाऊ शकते असे आज विधानपरिषदेत स्पष्ट केले.

Updated: Apr 4, 2013, 03:01 PM IST

www.24taas.com, मुंबई
उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी देखील MPSC परीक्षा ५ ते १० दिवस पुढे ढकलली जाऊ शकते असे आज विधानपरिषदेत स्पष्ट केले. MPSC परीक्षाबाबत गोंधळ झालेला असल्याने विद्यार्थ्यांमध्ये संभ्रमावस्था निर्माण झाली आहे. विधानपरिषदेतही ह्या मुद्द्यावर चर्चा करण्यात आली. उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी MPSC विद्यार्थ्यांच्या बाजू घेत. सरकारला घरचा आहेर दिला आहे.
`MPSC परीक्षा पुढे ढकलली जाऊ शकते`, आणि परीक्षा पाच ते दहा दिवस पुढे ढकलल्याने काहीही बिघडणार नाही. असं म्हणत अजित पवारांनी ठाम भूमिका घेतली आहे. विधान परिषदेत MPSC परीक्षेवर चर्चा करण्यात आली. त्याचवेळेस अजित पवारांनी याविषयीची स्पष्टोक्ती विधानपरिषदेत दिली. विद्यार्थ्यांमध्ये परीक्षेबाबत असलेला गोंधळ आणि दोन दिवसात सगळे फॉर्म भरले जातील असा MPSCचा असलेला दावा यामुळे अजित पवारांनी आपलं मत व्यक्त केलं आहे.

`मात्र हे माझं वैयक्तिक मत असल्याचेही त्यांनी स्पष्ट केलं.` अजित पवारांच्या या वक्तव्याने मात्र त्यांनी सरकारला घरचा आहेर दिला आहे. विद्यार्थ्यांत भीतीचं वातावरण असल्याचेही अजित पवार यांनी स्पष्ट केले.