...आणि ‘मिशन एक्स’ कंप्लीट

By Surendra Gangan | Last Updated: Wednesday, November 21, 2012 - 11:11

www.24taas.com,मुंबई
क्रुरकर्मा आणि पाकिस्तानी नागरिक लष्कर-ए-तैयबा या संघटनेचा दहशतवादी असलेल्या अजमल कसाब याला फाशी देऊन त्याचा शेवट करण्यात आलाय. त्याला फाशी देण्यासाठी ‘मिशन एक्स’ असे नाव देण्यात आले होते. कसाबला ७.३० वाजता फाशी देण्यात आल्यानंतर ७.४५ वाजता गृहमंत्र्यालया फोन आला, ‘मिशन एक्स’ कंप्लीट.
कसाब आणि त्याचे सहकारी नऊ दहशतवाद्यांनी, २६ नोव्हेंबर, २००८ रोजी मुंबईच्या विविध भागांत हल्ले करून तब्बल चार दिवस मुंबईला वेठीस धरले होते. कित्येक निरपराध लोकांचे बळी गेले होते. याप्रकरणी कसाबला दोषी ठरविण्यात आले. त्यानंतर न्यायालयाने त्याला फाशीची शिक्षा ठोठावण्यात आली होती. मात्र, फाशी देण्यास उशीर होत असल्याने संतापाची भावना व्यक्त होत होती. त्यातच कसाबने राष्ट्रपतींकडे दयेचा अर्ज केला होता. हा दयेचा अर्ज राष्ट्रपती प्रणव मुखर्जी यांनी फेटाळला. त्यामुळे त्याचे नाव ब्लॅक वॉरंडमध्ये गेले. त्यामुळे त्याला फाशी देण्याशिवाय पर्याय नव्हता.
राज्य सरकारने कमालीची गुप्तता पाळून कसाबला मुंबईतील ऑथर रोड जेलमधून रात्रीच पुण्यातील येरवडा तुरूंगात हलविले. त्यामुळे मीडियालाही त्याचा सुगावा लागला नाही. कसाबला फाशी देण्यासाठी ‘मिशन एक्स’ असे नाव देण्यात आले होते. हे मिशन सकाळी ७.४५ वाजता पार पडल्याचा फोन गृहमंत्रालयाला आला. हे वृत्त नंतर मीडियाला समजले आणि हे वृत्त वाऱ्यासारखे पसरले. त्यानंतर गृहमंत्री आर. आर. पाटील यांनी पत्रकार परिषद घेवून अधिकृत माहिती दिली. त्यानंतर एकच जल्लोष करण्यात आला.

First Published: Wednesday, November 21, 2012 - 11:11
comments powered by Disqus