अबू जुंदालला दिसतंय कसाबचं भूत!

By Jaywant Patil | Last Updated: Wednesday, March 6, 2013 - 16:17

www.24taas.com, मुंबई
२६/११ च्या मुंबई हल्ल्यातील सूत्रधार अबु जुंदाल याने आपल्याला अजमल कसाब दिसत असल्याचं सांगितल्यामुळे अबु जुंदालच्या वैद्यकीय तपासण्या करण्याचे आदेश मोक्का न्यायालयाने ऑर्थर रोड जेलला दिले आहेत.
जुंदालने कोर्टामध्ये आपल्याला अजमल कसाब दिसत असल्याचे भास होत असल्याचं निवेदन पत्र सादर केलं आहे. याआधी सौदी अरेबियात त्याची चौकशी करत असताना तसंच तिहार जेलमध्येही चौकशीच्यावेळी त्याने आपलं मानसिक स्वास्थ्य ठीक नसल्याचं म्हटलं होतं. आता कसाब आपल्या स्वप्नात येतो तसंच तो आपल्याला भेटत असल्याचे भास होतात, असं जुंदालने निवेदनात म्हटलं आहे.

मुंबई हल्ल्यात अबू जिंदालनं महत्त्वाची जबाबदारी निभावली होती. सध्या अटकेत असलेला दहशतवादी कसाबनंही हल्ल्यादरम्यान अबूकडून सूचना मिळत असल्याची माहिती दिली होती. दिल्ली पोलिसांनी अबूला पकडल्यावर त्याला मुंबई पोलिसांच्या स्वाधीन करण्यात आलं.First Published: Wednesday, March 6, 2013 - 16:17


comments powered by Disqus