...तर विरप्पनला पहिलं सॅल्यूट केलं असता - विजय कुमार

Last Updated: Friday, April 21, 2017 - 08:21
...तर विरप्पनला पहिलं सॅल्यूट केलं असता -  विजय कुमार

मुंबई : विरप्पन जिवंत भेटला असता तर त्याला पहिलं सॅल्यूट केला असता असं मत विरप्पनवर पहिली गोळी झाडून त्याला ठार मारणारे स्पेशल टास्क फोर्सचे प्रमुख के विजय कुमार यांनी व्यक्त केलं आहे.

विरप्पन चेसिंग द ब्रिगंड या के विजय कुमार यांच्या पुस्तकाच्या प्रकाशनावेळी त्यांनी हे मत व्यक्त केलं. या प्रकाशन समारंभाला अभिनेता अक्षय कुमार, पोलीस महासंचालक सतीश माथूर, मुंबई पोलीस आयुक्त दत्ता पडसलगीकर उपस्थित होते. यावेळी अक्षय कुमारने काही मिश्किल प्रश्नही विचारले, त्याची विजय कुमार यांनी मार्मिक उत्तरं दिली. विरप्पन जिवंत सापडला असता तर त्याला सॅल्यूट केला असता पण तो जिवंत सापडलाच नाही. त्याला आम्ही घेरायचो तेव्हा तो अंधाधुंद फायरींग करायचा असं उत्तर त्यांनी दिलं.

First Published: Friday, April 21, 2017 - 08:21
comments powered by Disqus