अमित शहा 'मातोश्री'वर जाणार, घेणार उद्धव यांची भेट

भाजपचे राष्ट्रीय अध्यक्ष अमित शहा आणि शिवसेना पक्षप्रमुख उद्धव ठाकरे यांची अखेर भेट होणार आहे. अमित शहा हे ठाकरे यांची भेट घेणार आहेत, अशी माहिती नेते विनोद तावडे यांनी दिली.

Updated: Sep 4, 2014, 07:56 PM IST
अमित शहा 'मातोश्री'वर जाणार, घेणार उद्धव यांची भेट title=

 मुंबई : भाजपचे राष्ट्रीय अध्यक्ष अमित शहा आणि शिवसेना पक्षप्रमुख उद्धव ठाकरे यांची अखेर भेट होणार आहे. अमित शहा हे ठाकरे यांची भेट घेणार आहेत, अशी माहिती नेते विनोद तावडे यांनी दिली.

'मातोश्री' या निवासस्थानी आज रात्री साडेनऊ वाजता उद्धव ठाकरे यांची शहा भेट घेणार आहेत. शहा हे 'मातोश्री' या उद्धव ठाकरे यांच्या निवासस्थानी जाऊन त्यांची भेट घेणार की नाहीत, याबाबत सोशल मीडियावर चर्चा होती. अखेर यावर पडदा पडला आहे.  उद्धव ठाकरे यांनी दिलेले निमंत्रण शहा यांनी स्वीकारले असल्याचे, तावडे यांनी सांगितले.

अमित शहा आज सायंकाळी मुंबईतील ष्णमुखानंद सभागृहात होणाऱ्या कार्यक्रमात सहभागी होण्यापूर्वी शिवाजी पार्क येथे जाऊन बाळासाहेब ठाकरे यांच्या समाधीचे दर्शन घेणार आहेत. त्यानंतर ते गणेश मंडळांना भेट देऊन रात्री उद्धव ठाकरेंना भेटतील, असे तावडे यांनी माहिती देताना सांगितले.

* इतर ताज्या बातम्या सदैव पाहण्यासाठी झी २४ तासला फेसबुकवर जॉइंन करा.

*  झी २४ तासला ट्विटरवर फोलो करा.