फेसबूकवर आल्यावर अमित ठाकरेंनी काढलं वडिलांचं व्यंगचित्र

मनसे अध्यक्ष राज ठाकरेंचा मुलगा अमित ठाकरेंनी फेसबूकवर एन्ट्री घेतली आहे.

Updated: Feb 7, 2017, 10:14 PM IST
फेसबूकवर आल्यावर अमित ठाकरेंनी काढलं वडिलांचं व्यंगचित्र title=

मुंबई : मनसे अध्यक्ष राज ठाकरेंचा मुलगा अमित ठाकरेंनी फेसबूकवर एन्ट्री घेतली आहे. अमित ठाकरेंनी त्यांचं फेसबूक पेज तयार केलं आहे. या फेसबूक पेजच्या माध्यमातून ते व्यंग्यचित्रकार म्हणूनही लोकांसमोर येत आहेत. फेसबूक पेज तयार केल्यावर लगेच अमितनं राज ठाकरेंचं व्यंगचित्र शेअर केलं आहे. ज्यांच्याकडून शिकलो, त्यांच्याच पासून सुरूवात करत असल्याचं हे व्यंगचित्र शेअर करताना अमित ठाकरे म्हणाले आहेत.

 

मला माझ्या विचारसरणीचे खूप लोकं भेटत होते. त्यांना त्याचवेळी माझ्या बाबांसमोर विचार मांडायचे होते तसेच 'अमित ठाकरे' म्हणून माझे विचार समजून घ्यायला ते उत्सुक होते. पण इतक्या मोठ्या संख्येने असलेल्या लोकांशी संवाद साधायला खूप वेळ लागणार. त्यामुळे कमीत कमी वेळात जास्तीत जास्त लोकांपर्यंत पोहोचायला Facebook page चा पर्याय वापरतोय, असे ते म्हणालेत.