'त्या बातम्यांमध्ये तथ्य नाही, मी पूर्णपणे फिट'

मनसे अध्यक्ष राज ठाकरे यांचा मुलगा अमित ठाकरे यांच्या तब्येतीविषयी काही बातम्या कालपासून सोशल नेटवर्किंगवर व्हायरल होत होत्या. या बातम्यांमध्ये कोणतंही तथ्य नाही. मी पूर्णपणे फिट आहे, असं स्पष्टीकरण खुद्द अमित ठाकरेंनीच दिलं आहे. माय मेडिकल मंत्रा या वेबसाईटशी बोलताना अमितनं ही प्रतिक्रिया दिली आहे.

Updated: Feb 17, 2017, 09:19 PM IST
'त्या बातम्यांमध्ये तथ्य नाही, मी पूर्णपणे फिट'

मुंबई : मनसे अध्यक्ष राज ठाकरे यांचा मुलगा अमित ठाकरे यांच्या तब्येतीविषयी काही बातम्या कालपासून सोशल नेटवर्किंगवर व्हायरल होत होत्या. या बातम्यांमध्ये कोणतंही तथ्य नाही. मी पूर्णपणे फिट आहे, असं स्पष्टीकरण खुद्द अमित ठाकरेंनीच दिलं आहे. माय मेडिकल मंत्रा या वेबसाईटशी बोलताना अमितनं ही प्रतिक्रिया दिली आहे.

सोशल नेटवर्किंगवर व्हायरल होणारे ते मेसेज मी पण वाचले. काही दिवसांपूर्वी मी आजारी होतो, पण हा छोटासा आजार होता. आता माझी तब्येत व्यवस्थित आहे आणि मी महापालिका निवडणुकीसाठी प्रचार करत आहे, असं अमित म्हणाला आहे.