ती सध्या सगळ्या प्रकल्पांना विरोध करते, शेलारांचे शिवसेनेला चिमटे

ती सध्या काय करते हा मराठी चित्रपट प्रेक्षकांच्या पसंतीला उतरला आहे. याच चित्रपटावरून भाजप आमदार आशिष शेलार यांनी शिवसेनेला चिमटे काढले आहेत.

Updated: Jan 9, 2017, 11:12 PM IST
ती सध्या सगळ्या प्रकल्पांना विरोध करते, शेलारांचे शिवसेनेला चिमटे  title=

मुंबई : ती सध्या काय करते हा मराठी चित्रपट प्रेक्षकांच्या पसंतीला उतरला आहे. याच चित्रपटावरून भाजप आमदार आशिष शेलार यांनी शिवसेनेला चिमटे काढले आहेत. ती सध्या सगळ्या प्रकल्पांना विरोध करते, असं आशिष शेलार म्हणाले आहेत.

ती सध्या 50 दिवसानंतरही बँकेच्या रांगेत उभी आहे, अशी टीका शिवसेनेनं सामनामधून केली होती. आशिष शेलार यांनी या टीकेला प्रत्युत्तर दिलं आहे. मुंबईतल्या लालबागमध्ये झालेल्या जाहीर सभेमध्ये आशिष शेलारांनी ही फटकेबाजी केली आहे.

मुंबई-अहमदाबाद बुलेट ट्रेन म्हणजे मुंबईला महाराष्ट्रापासून तोडण्याचा डाव आहे, असं राज ठाकरे म्हणाले होते. राज यांच्या या टीकेलाही शेलारांनी प्रत्युत्तर दिलं आहे. राज ठाकरेंचं वागणं मराठी चित्रपटातल्या बाबा लगीन गाण्यासारखं असल्याचं शेलार म्हणाले. तर आदित्य ठाकरे म्हणजे नया है वह असल्याचा टोमणा शेलारांनी मारला.