मुंबईत मनसेच्या नेत्यावर जीवघेणा हल्ला

महाराष्ट्र नवनिर्माणे सेनेचे दिंडोशी विभागाचे अध्यक्ष अरुण सुर्वे यांच्यावर शुक्रवारी जीवघेणा हल्ला करण्यात आला. अज्ञात हल्लेखोरांनी सुर्वे यांच्या मानेवर तसेच पाठीवर धारदार शस्त्राने वार केलेत.

Updated: Apr 9, 2016, 02:56 PM IST
मुंबईत मनसेच्या नेत्यावर जीवघेणा हल्ला  title=

मुंबई : महाराष्ट्र नवनिर्माणे सेनेचे दिंडोशी विभागाचे अध्यक्ष अरुण सुर्वे यांच्यावर शुक्रवारी जीवघेणा हल्ला करण्यात आला. अज्ञात हल्लेखोरांनी सुर्वे यांच्या मानेवर तसेच पाठीवर धारदार शस्त्राने वार केलेत.

राज ठाकरेंच्या भाषणाच्या अगोदरच चारकोप परिसरात काल दुपारी ही घटना घडली. या घटनेत सुर्वै गंभीर जखमी झाले असून त्यांच्यावर कोकिलाबेन अंबानी रुग्णालयात उपचार सुरू आहेत.

दरम्यान, हा हल्ला नेमका कोणी केला हे अद्याप समजू शकलेलं नाही. मात्र, हा हल्ला भाजपच्याच काही कार्यकर्त्यांनी घडवून आणलाय, असा सणसणाटी आरोप मनसेच्या पदाधिकाऱ्यांनी व्यक्त केलाय.