नारायण राणेंकडे लक्ष, दीपक केसरकर सेनेत जाणार

राजीनाम्यानंतर तब्बल 15 दिवसांनी काँग्रेसनेते नारायण राणे आज आपली भूमिका स्पष्ट करणार आहेत. राणेंचे कट्टर विरोधक दीपक केसरकरही आजच्याच मुहूर्तावर शिवबंधनात अडकणार आहेत.  याचीच राजकीय वर्तुळात चर्चा आहे.

Updated: Aug 5, 2014, 08:52 AM IST
नारायण राणेंकडे लक्ष, दीपक केसरकर सेनेत जाणार title=

मुंबई : राजीनाम्यानंतर तब्बल 15 दिवसांनी काँग्रेसनेते नारायण राणे आज आपली भूमिका स्पष्ट करणार आहेत. राणेंचे कट्टर विरोधक दीपक केसरकरही आजच्याच मुहूर्तावर शिवबंधनात अडकणार आहेत.  याचीच राजकीय वर्तुळात चर्चा आहे.

सिंधुदुर्गाच्या राजकारणात एकमेकांचे कट्टर राजकीय विरोधक असलेले नारायण राणे आणि दीपक केसरकर आज आपली निर्णायक राजकीय वाटचाल सुरु करत आहेत. शिवसेना पक्षप्रमुख उद्धव ठाकरे यांच्या प्रमुख उपस्थितीत केसरकर यांचा शिवसेनेत प्रवेश होत आहे.

सावतंवाडीमध्ये आयोजित करण्यात आलेल्या मेळाव्यात केसरकर शिवबंधनाचा धागा आपल्या मानगटावर बांधतील. तर कॉँग्रेसमध्ये बंडाचं निशाण रोवलेले राणे हे काँग्रेसशी असलेले आपले बंध तोडणार का, याबाबत उत्सुकता आहे. राणेंनी उद्योगमंत्रीपदाचा राजीनामा दिला आहे. पण पक्षाने त्याबाबत काहीच भूमिका न घेतल्यानं राणे आता पुढची वाटचाल स्पष्ट करणार आहेत.

* इतर ताज्या बातम्या सदैव पाहण्यासाठी झी २४ तासला फेसबुकवर जॉइंन करा.

*  झी २४ तासला ट्विटरवर फोलो करा.