...तर बाळासाहेबांच्या अंत्यविधीचा खर्च आम्ही करू

मनसेने वेगळी भूमिका घेतली आहे. अंत्यविधीचा बोजा मुंबईकरांवर पडू नये, अशी आमची भूमिका आहे. त्यामुळे ही पाच लाखाची रक्कम मनसे पालिकेला देईल.

Updated: May 23, 2013, 01:27 PM IST

www.24taas.com, झी मीडिया, मुंबई
शिवसेनाप्रमुख बाळासाहेब ठाकरे यांच्या अंत्यसंस्कारांवेळी पालिकेनं खर्च केलेल्या ५ लाख रुपयांच्या मंजुरीचा प्रस्ताव येत्या स्थायी समिती बैठकीत येणार आहे. याबाबत मनसेने वेगळी भूमिका घेतली आहे. अंत्यविधीचा बोजा मुंबईकरांवर पडू नये, अशी आमची भूमिका आहे. त्यामुळे ही पाच लाखाची रक्कम मनसे पालिकेला देईल, असे पक्षाचे गटनेते दिलीप लांडे यांनी बुधवारी सांगितले.
शुक्रवारी स्थायी समितीपुढे खर्चाचा प्रस्ताव चर्चेला येणार आहे. शासकीय इतमामातील या अंत्यविधीचा खर्च सरकारने करायला हवा. तसेच प्रस्ताव चर्चेला आणून युतीचे पदाधिकारी बाळासाहेबांची हेटाळणी करत असल्याचा मनसेचा आरोप आहे.
शिवाजी पार्कवर झालेल्या या अंत्यसंस्कारांवेळी मोठा पोलीस बंदोबस्त, मैदानावरील सीसीटीव्ही, एलईडी यासारख्या सुविधा पालिकेनं देऊ केल्या होत्या. फारसा वेळ हाती नसल्यानं निविदा न काढता हा खर्च मंजूर केला गेला होता.

इतर ताज्या बातम्या सदैव पाहण्यासाठी झी २४ तासला फेसबुकवर जॉइंन करा.
झी २४ तासला ट्विटरवर फोलो करा.