महाराजांच्या पुतळ्याशेजारी समाधीस्थळ? पोलिसांची मनाई

शिवसेनाप्रमुख बाळासाहेब ठाकरे यांच्यावर अंत्यसंस्कार करण्यात आलेला चौथरा विधीवत पूजा करुन शिवसैनिकांनी हटविला आहे.

Updated: Dec 18, 2012, 09:44 AM IST

www.24taas.com, मुंबई
शिवसेनाप्रमुख बाळासाहेब ठाकरे यांच्यावर अंत्यसंस्कार करण्यात आलेला चौथरा विधीवत पूजा करुन शिवसैनिकांनी हटविला आहे. हे समाधीस्थळ हलवत बाळासाहेबांच्या अंत्यसंस्काराची जागा पूर्ववत केली आहे. शिवाजी महाराजांच्या पुतळ्याशेजारी हलचाली वाढल्या आहेत. मात्र पोलिसांचा बंदोबस्तही वाढविण्यात आला आहे. त्यामुळे पोलिसांच्या बंदोबस्ताला शिवसैनिक झुगारणार का? याकडेच साऱ्यांचे लक्ष लागले आहे.
मात्र तरीही बाळासाहेबांची समाधीस्थळ शिवाजी पार्कवरच करण्यावर शिवसेना प्रयत्नशील आहे. त्यासाठी आज महापालिकेत एका विशेष बैठक घेऊन पर्यायी जागेविषयीचा प्रस्ताव मंजूर करण्यात येणार आहे.
शिवाजी महाराजाच्या पुतळ्याच्या डाव्या बाजूला किंवा पार्कमध्ये असणाऱ्या बंगाल क्लबच्या इमारतीच्या बाजूला बाळासाहेबांची समाधीस्थळ व्हावं असं शिवसेनेच्या नेत्यांचं म्हणणं आहे. शिवाजी पार्कवरील पर्यायी जागेवरच बाळासाहेबांचा चौथरा उभारला जाणार आहे.