वांद्रे पूर्व पोटनिवडणूक प्रचारात रंगत, कुटुंबीय उतरलेत प्रचारात

वांद्रे पूर्व पोटनिवडणुकीचा प्रचारात आजपासून ख-या अर्थान रंगत आलीय. कारण काँग्रेसचे उमेदवार नारायण राणे यांनी थेट मातोश्रीच्या दारात धडक दिली. राणेंनी ठाकरेंच्या कलानगरमध्ये जोरदार रोड शो करत शक्ती प्रदर्शन केलं.

Updated: Apr 2, 2015, 07:55 PM IST
वांद्रे पूर्व पोटनिवडणूक प्रचारात रंगत, कुटुंबीय उतरलेत प्रचारात title=

मुंबई : वांद्रे पूर्व पोटनिवडणुकीचा प्रचारात आजपासून ख-या अर्थान रंगत आलीय. कारण काँग्रेसचे उमेदवार नारायण राणे यांनी थेट मातोश्रीच्या दारात धडक दिली. राणेंनी ठाकरेंच्या कलानगरमध्ये जोरदार रोड शो करत शक्ती प्रदर्शन केलं.

राणेंना विजयी करण्यासाठी संपूर्ण राणे कुटुंबच प्रचाराच्या मैदानात उतरलंय. राणेंच्या पत्नी नीलम राणे, तसंच  ज्येष्ठ पुत्र नीलेश राणेही प्रचारात सहभागी झाले होते. नीलम राणे यांनी महिलांसह प्रचार रॅली काढून राणेंचा जोरदार प्रचार केला. शिवसेनेचा मानबिंदू असलेल्या थेट मातोश्री भागातच, नारायण राणे यांची ही रॅली राणेंची शिवसेना बालेकिल्ल्याला धडक अशाच रुपात पाहिली गेली. 

वांद्रे पूर्व निवडणुकीच्या प्रचारासाठी आता ठाकरे आणि राणे कुटुबांच्या महिलांनीही आघाडी घेतलीय. काल शिवसेनापक्षप्रमुख उद्धव ठाकरे यांच्या पत्नी रश्मी ठाकरे यांनी काल शिवसेना महिला आघाडीचा मेळावा घेतला होता. रश्मी ठाकरेंना उत्तर देण्यासाठी आज काँग्रेस उमेदवार नारायण राणे यांच्या पत्नी नीलम राणे यांनीही प्रचारात उडी घेतली. नीलम राणे यांनी काँग्रेसच्या कार्यकर्त्यांसह वांद्रे पूर्व मतदारसंघाच्या काही भागात पायी रॅली काढली. 

* इतर ताज्या बातम्या सदैव पाहण्यासाठी झी २४ तासला फेसबुकवर जॉइंन करा.

*  झी २४ तासला ट्विटरवर फोलो करा.