रेल्वेनंतर ‘बेस्ट’च्याही तिकीट दरांत वाढ!

‘बेस्ट’च किमान तिकीट एक रूपयानं वाढणार आहे. पण, नागरिकांना आत्ताच या दरवाढीचा फटका बसणार नाही कारण बेस्टची ही तिकीट दरवाढ २०१४ पासून लागू होणार आहे.

Shubhangi Palve शुभांगी पालवे | Updated: Oct 5, 2013, 08:07 PM IST

www.24taas.com, झी मीडिया, मुंबई
‘बेस्ट’च किमान तिकीट एक रूपयानं वाढणार आहे. पण, नागरिकांना आत्ताच या दरवाढीचा फटका बसणार नाही कारण बेस्टची ही तिकीट दरवाढ २०१४ पासून लागू होणार आहे.
बेस्टनं २०१३ मध्ये पाच रूपयांचं तिकीट दरवाढीनंतर सहा रुपये केलं होतं. याच तिकीटांमध्ये २०१४ मध्ये पुन्हा एका रुपयानं वाढ होतेय. म्हणजेच आत्ता सहा रूपयांना मिळणाऱ्या तिकीटासाठी २०१४ नंतर सात रूपये मोजावे लागणार आहेत. त्यामुळे मुंबईकरांना महागाईच्या वाढत्या बोज्यात बेस्टच्या तिकीट दरवाढीचा सामना करावा लागणार आहे.

बेस्टनं ही तिकीट दरवाढ परिवहन विभागात होणारा तोटा भरून काढण्यासाठी केल्याचा खुलासा बेस्ट महाव्यस्थापकान केलाय. याच वेळी बेस्टचा तोटा भरून काढण्यासाठी महाव्यवस्थापकांनी मुंबई महापालिकेनं ट्रान्सपोर्ट सेज रक्कम आकारावी अशीही मागणी केलीय.
* इतर ताज्या बातम्या सदैव पाहण्यासाठी झी २४ तासला फेसबुकवर जॉइंन करा.
* झी २४ तासला ट्विटरवर फोलो करा.