बेस्ट घेणार मुंबई महापालिकेकडून कर्ज

By Jaywant Patil | Last Updated: Tuesday, October 23, 2012 - 08:54

www.24taas.com, मुंबई
बेस्टची आर्थिक अवस्था बिकट असल्यामुळे आर्थिक संकटाचा सामना करण्यासाठी बेस्टनं मुंबई महापालिकेकडून कर्ज घेण्याचा निर्णय घेतलाय. बेस्टला 12 टक्के दरानं पाच वर्षांसाठी 1 हजार 600 कोटी रुपयांचं कर्ज देण्याचा प्रस्ताव बेस्ट बैठकीत मंजूर करण्यात आलाय.
मुंबई महापालिकेकडून 12 टक्के व्याजदरानं तातडीनं कर्ज घेतलं तरच दिवाळीत कर्मचा-यांना पगार देता येईल अशी माहिती बेस्ट व्यवस्थापनामार्फत दिली होती. तसंच वेळेत निधी मिळाला नाही तर मुंबईकरांना दिवाळीत जादा वीज पुरवणेही अशक्य असल्याचं बेस्ट चेअरमन माहीती दिली आहे.
दुसरीकडे बेस्ट उपक्रम हा महापालिकेचाच भाग असल्यानं एवढ्या व्याजदरानं कर्ज घेणं योग्य नसल्याचं काँग्रेसनं म्हटलंय. त्यामुळे शून्य टक्के दराने पालिकेनं कर्ज द्यावं अशी मागणी काँग्रेसनं केली आहे.

First Published: Tuesday, October 23, 2012 - 08:54
comments powered by Disqus