गोपीनाथ मुंडे, विनोद तावडे पोलिसांच्या ताब्यात

मुंबईत भाजप नेते गोपीनाथ मुंडे, विनोद तावडे, जयवंतीबेन मेहता, शायना एन. सी, अतुल शहा यांना पोलिसांनी अटक केली. मंत्रालय बंद पाडण्यास गेलेल्या भाजपच्या नेत्यांना पोलिसांनी ताब्यात घेतले आहे.

Surendra Gangan सुरेंद्र गांगण | Updated: Sep 20, 2012, 01:45 PM IST

www.24taas.com,मुंबई
मुंबईत भाजप नेते गोपीनाथ मुंडे, विनोद तावडे, जयवंतीबेन मेहता, शायना एन. सी, अतुल शहा यांना पोलिसांनी अटक केली. मंत्रालय बंद पाडण्यास गेलेल्या भाजपच्या नेत्यांना पोलिसांनी ताब्यात घेतले आहे.
एफडीआय, डिझेल दरवाढ आणि सिलिंडर सबसिडीवर आणलेल्या मर्यादा या विरोधात भाजप, डावे आणि समाजवादी पक्षाने भारत बंद पुकारला आहे. मुंबईत बुधवारी सकाळपासून जनजीवन सुरळीत सुरु आहे. भारत बंदचा मुंबईसह राज्यात कोणताही परिणाम झालेला दिसत नाही. दरम्यान, गोपीनाथ मुंडे, विनोद तावडे यांच्यासह १०० कार्यकर्ते मंत्रालय बंद करण्यासाठी भाजप मुख्यालयाजवळून निघाले असता त्यांना पोलिसांनी ताब्यात घेतले आहे. या सर्वांना दुपारनंतर त्यांना आझाद मैदानात सोडण्यात येणार असल्याचे सांगण्यात आले.
गणेशोत्सवाच्या पार्श्वभूमीवर शिवसेना व मनसेने भारत बंदच्या आंदोलनात सहभागी न होण्याचा निर्णय़ घेतला होता. त्यामुळे अखेर भाजपच्या नेत्यांनी मंत्रालय बंद पाडण्याचा प्रयत्न केला. मात्र त्यांचे मनसुबे पोलिसांनी उधळून लावले.