`त्या` मॉडेलचा खून झालाच नाही....

Last Updated: Thursday, November 1, 2012 - 20:46

www.24taas.com, मुंबई
मॉडेल बिदुषी बर्डे मृत्यू प्रकरणाला नविन वळण आलं आहे. मुंबई क्राईम ब्रांचने दावा केला आहे की, बिदुषीची हत्या करण्यात आली नाही तर तिचा अपघातामुळे मृत्यू झालाय...डॉक्टरांनी दिलेल्या रिपोर्टचा आधार घेत क्राइम ब्रांचने सांगितलय कि, बिदुषी कदाचित काचेचा टेबलवर आपटली असणार आणि त्यामुळेच तिच्या मृत्यू झाला असावा...
कारण, क्राइम ब्रांचने केलेल्या आता पर्यंतचा तपासात बिदुषीची हत्या झाली असावी असा कुठलाही पुरावा त्यांचा हाती लागलेला नाही आहे..पोलीसांनी बिल्डींग परिसरातील सीसीटीव्हीही तपासून बघितले मात्र, त्यातही काहीही संशयास्पद दिसून आलं नाही...
मोलकरणी आणि नवरा केदार बर्डेने दिलेल्या जबाबामुळे पोलीसांची दिशाभूल झाल्याचं क्राइम ब्रांचचा अधिका-यांनी सांगितलं..बिदुषीला मधुमेहाचा आजार होता. आणि याच आजारामुळे तिला वारंवार चक्कर सुद्धा यायचे..एकूणच पोलीस म़ॉडेल बिदुषीचे पति केदार बर्डेला क्लीनचीट देण्याचा तयारीत आहे..

First Published: Thursday, November 1, 2012 - 20:40
comments powered by Disqus