मुंबईत फटाक्यांमुळे मोठ्या प्रमाणात प्रदूषण

मुंबईकरांनी मोठ्या जल्लोषात दिवाळी साजरी केली असली तरी फटाके उडवण्यापासून ते दूर राहू शकलेले नसल्याचं पुढं आलंय.शनिवारी फटाके उडवण्याचं प्रमाण कमी असल्याचं दिसून आलं मात्र रविवारी मुंबईकरांनी याची भर काढली आणि मोठ्या प्रमाणात फटाके उडवले. यामुळे मुंबईकतलं वायू प्रदूषण मोठ्या प्रमाणावर वाढलं असून कार्बन डायऑक्साईड, नायट्रोजन आणि ओझोनच्या पातळीत वाढ झाल्याचं दिसून आलं.

Updated: Oct 31, 2016, 05:26 PM IST
मुंबईत फटाक्यांमुळे मोठ्या प्रमाणात प्रदूषण title=

मुंबई : मुंबईकरांनी मोठ्या जल्लोषात दिवाळी साजरी केली असली तरी फटाके उडवण्यापासून ते दूर राहू शकलेले नसल्याचं पुढं आलंय.शनिवारी फटाके उडवण्याचं प्रमाण कमी असल्याचं दिसून आलं मात्र रविवारी मुंबईकरांनी याची भर काढली आणि मोठ्या प्रमाणात फटाके उडवले. यामुळे मुंबईकतलं वायू प्रदूषण मोठ्या प्रमाणावर वाढलं असून कार्बन डायऑक्साईड, नायट्रोजन आणि ओझोनच्या पातळीत वाढ झाल्याचं दिसून आलं.

दिवाळीत फटाक्यांमुळे ध्वनी आणि हवा प्रदूषण तर होतंच मात्र  त्याचबरोबर फटाक्यांमुळे कचराही होतो. शिवाजी पार्कवर अनेक ठिकाणी फटाके वाजवले जात असून मुंबईत अनेक ठिकाणी फटाक्यांचा कचरा सर्वत्र विखुरलेला पहायला मिळाला.