मुंबईत हे दिग्गज झाले पराभूत

मुंबई महापालिकेत सत्तेसाठी शिवसेना आणि भाजपमध्ये जोरदार रस्सीखेच झाली.  शिवसेनेला ८४ जागा तर भाजपला ८२ जागा मिळाल्या. काँग्रेसने ३१ जागांवर यश मिळवलं.   २७ जागांवरून ७ जागांवर आलेल्या मोठा फटका मनसे बसला.

Updated: Feb 23, 2017, 09:58 PM IST
 मुंबईत हे दिग्गज झाले पराभूत  title=

मुंबई : मुंबई महापालिकेत सत्तेसाठी शिवसेना आणि भाजपमध्ये जोरदार रस्सीखेच झाली.  शिवसेनेला ८४ जागा तर भाजपला ८२ जागा मिळाल्या. काँग्रेसने ३१ जागांवर यश मिळवलं.   २७ जागांवरून ७ जागांवर आलेल्या मोठा फटका मनसे बसला.

ठासून नाही घासून झालेल्या या निवडणुकीत अनेक दिग्गजांना पराभवाचे तोंड पाहावे लागले आहे. 

या बिग शॉट उमेदवारांना शॉक...

– विनोद शेलार – भाजप (आशिष शेलार यांचा भाऊ)

– प्रवीण छेडा – काँग्रेस (विरोधी पक्षनेते)

– यशोधर फणसे – शिवसेना (स्थायी समिती अध्यक्ष)

– मंगेश सांगळे – भाजप (मनसेचे माजी आमदार)

– तृष्णा विश्वासराव – सभागृह नेत्या

– कामिनी शेवाळे – शिवसेना (खासदार राहुल शेवाळे यांची पत्नी)

– देवेंद्र आंबेरकर – शिवसेना (माजी विरोधी पक्षनेता)

– निकिता निकम – काँग्रेस (माजी विरोधी पक्षनेते ज्ञानराज निकम यांच्या कन्या)

– तेजस्विनी आंबोले – भाजप (नाना आंबोले यांच्या पत्नी)

– स्वप्ना देशपांडे – मनसे (संदीप देशपांडे यांच्या पत्नी)